Breaking
ब्रेकिंग

लासलगाव येथील कचरा डेपो प्रश्न मार्गी; माजी खासदार समीर भुजबळ यांचा नागरिकांकडून सन्मान

0 4 6 8 5 8

लासलगाव येथील कचरा डेपो प्रश्न मार्गी; माजी खासदार समीर भुजबळ यांचा नागरिकांकडून सन्मान

*लासलगाव कचरा डेपो व खत प्रकल्प नवीन जागेत स्थलांतरित करा; लासलगाव शहर विकास समिती व स्थानिक नागरिकांकडून माजी खासदार समीर भुजबळ यांना निवेदन*

*लासलगाव कचरा डेपो व खतप्रकल्प नवीन जागेत स्थलांतरित करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ – माजी खासदार समीर भुजबळ*

*लासलगाव,दि.१९ मे:-* शिवनदी संवर्धन योजनेअंतर्गत लासलगाव येथील कचरा डेपोचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येणार आहे. येथील स्थानिक नागरिकांच्या मागणी नुसार या कचरा डेपो व खतप्रकल्पाला योग्य त्या जागेवर स्थलांतरित करण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून १३ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीतून लासलगाव येथील शिवनदी संवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम सुरू असून, या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत झाली आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव शहर विकास समिती व परिसरातील नागरिकांच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहर विकास समिती व नागरिकांच्या वतीने कचरा डेपो व खतप्रकल्प इतर जागेत हलविण्यात यावा याबाबत निवेदन देण्यात आले.

शिवनदी परिसरातील स्वच्छता, नदी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांमुळे संपूर्ण परिसराचे रूप पालटले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक दिवसांपासून नदीकाठावर निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्येमुळे परिसरात दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होत होत्या. मात्र, या प्रश्नावर प्रभावीपणे पाठपुरावा करून तो मार्गी लावण्यात माजी खासदार समीर भुजबळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी लासलगाव शहर विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी माजी खासदार समीर भुजबळ यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, शिवनदी परिसर पुन्हा प्रदूषित होऊ नये यासाठी सध्या कार्यरत असलेला कचरा डेपो व खतप्रकल्प इतर पर्यायी जागेवर स्थलांतरित करण्यात यावा. परिसरात शैक्षणिक संस्था व दाट वस्ती असल्याने भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत, अशीही भावना नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी नागरिकांच्या भावना समजून घेत लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच शिवनदी संवर्धन आणि शहर स्वच्छतेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी राजेश कराड,शेखर कुलकर्णी, संदिप उगले, मयुर झांबरे, विकास कोल्हे, सुरज श्रीवास्तव, चंद्रकांत नेटारे, बापु कुशारे, प्रकाश पाटील, भुषण वाळेकर, धर्मेश जाधव, महेश मोरे, महेंद्र हांडगे, दत्ता कुमावत, बाळु सोनवणे, प्रमोद पाटील, संकेत वाळेकर, अभिनव भंडारी, सतिष खैरणार, शुभम शेरेकर, अमोल कुमावत यांच्यासह सुमती नगर, परिसरातील नागरिक व लासलगाव शहर विकास समितीचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 8 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे