मुंबईसह महाराष्ट्रातील प्रसिध्द डोंबिवलीचा नमो रमो गरबा
डोंबिवली/प्रतिनिधी – मुंबई आणि महाराष्ट्रात डोंबिवलीचा नमो रमो गरबा आता फार प्रसिद्ध झाला आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून डोंबिवलीची कीर्ती सर्वत्र आहेच. पण गेली काही वर्ष नमो रमो नवरात्री या नावाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्री उत्सवही डोंबिवलीतच साजरा केला जातो त्यात जगप्रसिद्ध गरबा कलाकार येण्यास उत्सुक असतात. यंदा गरबा क्वीन या विशेषणाने संबोधली जाणारी गीताबेन रबारी पुन्हा एकदा नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या नमो रमो नवरात्रीचा उत्सव रंगतदार करण्यास येणार आहे सोबत ख्यातनाम गरबा गायक निलेश गढवी यांची साथ त्यांना लाभणार आहे.
नमो रमो नवरात्रीची संकल्पना रुजवणारे आणि सर्व संस्थांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे डोंबिवलीचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्र दादा चव्हाण यांच्यामुळेच हा नवरात्री उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो.
अतिशय भक्तिभावात हिंदू रीतीप्रमाणे अंबे मातेची प्रतिष्ठापना केली जाते. सकाळ संध्याकाळ विधिवत पूजा आरती करून….. महिषासुर मर्दिनीचा गजर करून देवीला नैवेद्य वाढून आवाहन केलं जातं आणि रात्री भव्य मंडपात देवीसमोर गरबा खेळाला जातो. केवळ कल्याण डोंबिवलीच नाही तर ठाणे मुंबई वाशी पालघर आणि मुंबई बाहेरून गरबा खेळण्यासाठी पारंपारिक वेशभूषेत गरबा प्रेमी अवघी तरुणाई या नमो रमो नवरात्रीत उत्साहात सामील होते. नमो रमो नवरात्रीच्या स्थळांचं पावित्र्य तिथे मंडपातच उभारलेल्या अंबे मातेच्या मंदिरात आहे. आणि यंदाचं अजून एक प्रमुख आकर्षण म्हणजे मातेच्या या मंदिरात दररोज नव्या नव्या रंगांच्या ताज्या फुलांची सजावट करण्यात येणार आहे. ख्यातनाम पुष्परचनाकार श्याम भगत यांच्यातर्फे सजावट करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय धबडे ह्यांनी भव्य सेट उभारला आहे. तसेच यावर्षी पूर्ण वातानुकूलित 70 हजार स्क्वेअर फूट प्लेयिंग अरेना आहे. त्यासाठी स्वस्तिक इव्हेंट्सचे अनिल पासड ह्यांनी 135 फूट बाय 500 फूट अशा भव्य एसी डोमची निर्मिती केली आहे. टीटू कुलकर्णी ह्यांचा जबरदस्त साऊंड असून दरवर्षी प्रमाणे यंदाही गरबा प्रेमींना सुरक्षित, निरोगी आणि आनंदी वातावरणात गरब्याचा मनमुराद आनंद लुटता यासाठी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर बारकाईने विशेष लक्ष देण्यात आले आहे. म्हणूनच एसी टॉयलेट्स, अनुचित प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही आणि बाऊन्सर्सची प्रायव्हेट सिक्युरिटी या बरोबरच फूड कोर्ट, पार्किंग, सेल्फी पॉईंट्स अशी उत्तम व्यवस्था केली आहे. पर्यावरणाचा संदेश देणार्या पर्यावरण पूरक कचरा पेट्या बसविण्यात आल्या असून जलचर जीवन वाचवा (क्वा लाईफ) ही संकल्पना त्यातून मांडली आहे. संपूर्ण घरडा सर्कल परिसरात नमो रमो गरबामुळे एक अनोखी ऊर्जा वातावरणात निर्माण झाली आहे. मराठी हिंदी गुजराथी रंगभूमी मालिका आणि चित्रपट कलाकार नमो रमो नवरात्री उत्सवात दरवर्षी आवर्जून हजेरी लावत आहेत. या वर्षी दिलीप जोशी, यश सोनी, मल्हार ठाकर, श्रध्दा डांगर, सई मांजरेकर, गष्मिर महाजनी, करण टॅकर, रिधिमा पंडित, जितेंद्र जोशी, उर्मिला कानिटकर, मंजोत सिंघ, आशिम गुलाटी, आर्या जाधव गरबा प्रेमींना भेटण्यास येणार आहेत.
प्रतिष्ठापना ते नवमी असा नऊ रात्रींचा गरबा एक आनंददायी आणि भरपूर ऊर्जा देणारा अनुभव असतो. दसर्याच्या दिवशी होणारं रावण दहन पाहण्यासाठी तर अलोट गर्दी होते….. प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर आपणही नमो रमो नवरात्रीच्या खेळात कुटुंबासह सहभागी व्हा…..चला भक्ती आणि शक्तीचं स्वरूप असलेल्या अंबे मातेच्या नवरात्रीचे जागर करूया….
3 ते 12 ऑक्टोबर रोज रात्री 6 ते 10 नमो रमो नवरात्री, सावळाराम महाराज क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली पूर्व.



