इंडियन आयडॉल 15 मध्ये बादशाह आदित्यला जे म्हणाला त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही!
या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वरील इंडियन आयडॉल सीझन 15 हा अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शो “ग्रँड म्युझिकल एक्स्प्लोझन” या खास भागात एक सुरेल धमाका करून मंच दणाणून सोडणार आहे. श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह या तीन प्रतिष्ठित परीक्षकांनी खूप काळजीपूर्वक सर्वश्रेष्ठ 15 स्पर्धकांची निवड केली आहे. हे असे स्पर्धक आहेत ज्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेने आणि परफॉर्मन्सेसने सर्वांना प्रभावित केले आहे. या आठवड्यात या स्पर्धकांना मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांकडून खास पाठिंबा मिळणार आहे. ज्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल आणि भारताचा पुढचा सर्वोत्तम गायक शोधण्याच्या प्रवासात ते हिरीरीने सहभागी होतील.
ही संध्या जबरदस्त क्षणांनी फुलली होती आणि अचानक एका उत्कृष्ट परफॉर्मन्सनंतर एक अवघडलेला क्षण आला. होस्ट आदित्य नारायणने शोमध्ये आलेल्या खास अतिथी उषा मंगेशकरला रॅपर बादशाहचा परिचय करून दिला. तिने त्याला ओळखले का असे आदित्यने तिला सहजच विचारले. त्यावर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत उषा मंगेशकरने सांगितले की ती त्याला ओळखत नाही. जे ऐकून बादशाह चक्रावून गेला.
हा अवघडलेपणा आणखीनच वाढला, जेव्हा उदित नारायणचा मुलगा आदित्य नारायणने तिला विचारले की, तो कोण आहे हे ती जाणते का? आश्चर्य म्हणजे तिने पुन्हा नकारार्थी उत्तर दिले. गोंधळून गेलेला आदित्य वातावरण हलके-फुलके ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण बादशाहने मात्र हसत हसत त्याला सांगितले, “मेरा तो बनता है आदित्य, तुम्हें तो जानकर भी मना कर दिया.”
बादशाहच्या या टिप्पणीला आदित्य काय उत्तर देईल?
इंडियन आयडॉल सीझन 15 मध्ये नाट्य उलगडताना बघत रहा दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!