ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र
भारत टायर्ससोबत सहयोगाने नाशिकमध्ये भारतातील पहिल्या मिशलिन एक्स्पोरिअन्स स्टोअरचे उद्धाटन
UDYAM-MH-23-0313678
0
4
2
9
5
7
भारत टायर्ससोबत सहयोगाने नाशिकमध्ये भारतातील पहिल्या मिशलिन एक्स्पोरिअन्स स्टोअरचे उद्धाटन
नाशिक: मिशलिन या जगातील आघाडीच्या टायर तंत्रज्ञान कंपनीने भारत टायर्ससोबत सहयोगाने भारतात आपले पहिले मिशलिन एक्स्पेरिअन्स स्टोअर लाँच केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील आडगाव येथे स्थित नाशिक आऊटलेट देशातील मिशलिनचे सर्वात मोठे स्टोअर आहे, जे प्रीमियम टायर विक्री व सर्वसमावेशक कार केअरमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करण्यात सज्ज आहे. मिशलिन एक्स्पेरिअन्स स्टोअर ब्रँडच्या कार्यक्षमता, नाविन्यता आणि शाश्वततेच्या शतकानुशतके वारशाला दृढ करण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आले आहे.

ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देणे हा मिशलिन एक्स्पेरिअन्स स्टोअरच्या डिझाइनमागील प्रमुख उद्देश आहे. मिशलिनच्या जागतिक वारसाचा दृश्यमान प्रवास मिशलिन वॉल ग्राहकांना उत्साहपूर्ण अनुभव देते. तसेच, ग्राहक हेरिटेज वॉलचा अनुभव घेऊ शकतात, जे मिशलिन आणि त्यांच्या स्थानिक डिलरशिप सहयोगीच्या वारसाला प्रशंसित करते, जेथे सर्वोत्तम जागतिक व स्थानिक पैलू एकत्र येतात. या सर्वोत्तम अनुभवामध्ये डिस्प्ले झोनचा देखील समावेश आहे, ज्यामधून इलेक्ट्रिक गतीशीलता, साहित्यामागील विज्ञान आणि पर्यावरणीय जबाबदारीमधील मिशलिनची नाविन्यता दिसून येते. ग्राहक प्रीमियम प्रॉडक्ट डिस्प्लेमध्ये मिशलिनच्या प्रीमियम टायर्सच्या व्यापक श्रेणीची तपासणी देखील करू शकतात, जेथे ब्रँडचा पोर्टफोलिओ, सुरक्षिततेप्रती कटिबद्धता आणि कार्यक्षमता पाहायला मिळते.
मिशलिन एक्स्पेरिअन्स स्टोअर २५,००० चौरस फूटांहून अधिक जागेवर पसरलेले आहे, ज्यामध्ये कार्स व ट्रक्ससाठी सर्विस क्षेत्रे, तसेच त्यांच्यासाठी पार्किंगचा समावेश आहे. हे स्टोअर ग्राहकांना टायर सर्विसेसच्या संपूर्ण श्रेणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान व प्रगत उपकरण देते. तसेच, पीपीएफ कोटिंग, अचूक व्हील अलाइनमेंट, प्रगत बॅलन्सिंग सर्विसेस्, नाविन्यपूर्ण पंक्चर दुरूस्ती सोल्यूशन्स, प्रोफेशनल कारबाबत तपशीलवार माहिती आणि कार अॅक्सेसरीजची व्यापक श्रेणी अशा सुविधा देखील दिल्या जातात. मिशलिनच्या शाश्वततेप्रती कटिबद्धतेशी बांधील राहत हे स्टोअर त्यांच्या कार वॉश सुविधेसाठी पाण्याचा अपव्यय कमी करण्याकरिता रिव्हर्स ओस्मोसिस वॉटर (आरओ)चा वापर करते. ग्राहकांना सर्वांगीण सुविधा देत समर्पित ग्राहक लाऊंज आणि कर्मचारी आहेत, जे प्रशिक्षित व प्रमाणित प्रोफेशनल्स आहेत.
उद्घाटनाप्रसंगी मत व्यक्त करत मिशलिन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. शंतनू देशपांडे म्हणाले, “आम्हाला भारतात मिशलिनचे पहिले एक्स्पेरिअन्स सेंटर लाँच करण्याचा अभिमान वाटतो. या स्टोअरचा समकालीन टायर विक्रीपलीकडे जाण्याचा आणि ग्राहकांना ब्रँडचा, आमच्या डिलर सहयोगींचा व सुरक्षित व शाश्वत असलेल्या आमच्या टायर सोल्यूशन्सच्या तंत्रज्ञान क्षमतांचा अनुभव देण्याचा एकमेव उद्देश आहे. वाढत्या प्रीमियम वेईकल मालकीहक्कासह प्रमुख हब नाशिक अशा केंद्रांपैकी पहिले केंद्र आहे, जे पश्चिम प्रांतामधील आमच्या उपस्थितीला अधिक दृढ करेल, तसेच ग्राहकांना अत्याधुनिक अनुभव व सेवा देईल.”
श्री. जेजो थॉमस यांचे नेतृत्व असलेली भारत टायर्स ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केटमधील विश्वसनीय कंपनी आहे, जिचा जवळपास पाच दशकांचा वारसा आहे. त्यांनी टायर सर्विसेसपासून सर्वसमावेशक कार केअर सोल्यूशन्स आणि आंतरराष्ट्रीय टायर ब्रँड्सच्या वितरणापर्यंत ऑफरिंग्ज वाढवल्या आहेत. नाशिकमधील हे त्यांचे दुसरे अत्याधुनिक केंद्र आहे.
नाशिक विकसित होत असलेले गतशीलता क्षेत्र आणि वाढत्या प्रीमियम वेईकल मालकीहक्कासह उच्च क्षमतेची बाजारपेठ आहे. हा धोरणात्मक सहयोग आणि नवीन विक्री धोरणाच्या माध्यमातून मिशलिनचा ग्राहक अनुभव अधिक उत्साहित करण्याचा आणि जागतिक दर्जाचे गतीशीलता सोल्यूशन्स वितरित करण्याचा मनसुबा आहे.
0
4
2
9
5
7


