Breaking
ई-पेपरब्रेकिंगराजकियशासकीयसामाजिक

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला ते पिंपळस रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी

पिंपळस ते येवला पर्यायी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे - मंत्री छगन भुजबळ

0 3 2 9 4 9

नाशिक, दि. २२ जून :-

पिंपळस येवला या रस्त्याचे चौपदरी काँक्रिटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या रस्त्यावर ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथून वाहनांची येजा करण्यासाठी जो पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्यात येऊन वाहतूक सुरळीत करावी अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून ५६० कोटी रुपये निधी पिंपळस ते येवला चौपदरी रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असून मंत्री छगन भुजबळ यांनी या कामाची आज निफाड परिसरात पाहणी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कंत्राटदार आणि कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे