*माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरण*
*मतदारसंघातील सहकारी सोसायट्यांना संगणक संचाचे वाटप*
*नाशिक,दि.२१ डिसेंबर :-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून केंद्र शासन पुरस्कृत संगणकीकरण कामकाज योजनेच्या माध्यमातून येवला मतदारसंघातील ११९ सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. यामध्ये येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील ३६ तर येवला तालुक्यातील ७१ सहकारी सोसायट्यांना संगणक संच देण्यात आले आहे. त्यामुळे आता सहकारी सोसायट्या डिजिटल होणार असून कामकाजाला अधिक गती मिळणार आहे.
केंद्र शासन पुरस्कृत संगणकीकरण कामकाज योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या पाठपुराव्याने आज मतदारसंघातील ११९ पैकी १०७ सोसायट्याना पहिल्या टप्प्यात संगणक संचाचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत सोसायट्यांना पुढील टप्यात संगणक संच मिळणार आहे.
केंद्र शासन पुरस्कृत संगणकीकरण कामकाज योजनेच्या माध्यमातून सहकारी सोसायट्यांना देण्यात येणाऱ्या साहित्यात संगणक संच, प्रिंटर, इन्व्हर्टर, वेब कॅम, सॉफ्टवेअर यासह एकूण ९ वस्तूंचा समावेश आहे. या माध्यमातून सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरण होऊन सर्व सोसायट्या डिजिटल होणार आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या कामाला गती मिळून शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.