Breaking
क्रिडा व मनोरंजननिवडब्रेकिंगमहाराष्ट्रसत्कारसामाजिक

ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’

'मिमा २०२६' सोहळा दिमाखात संपन्न !

0 4 4 8 0 1

‘मिमा २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न !
ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’

मराठी इंडी संगीत क्षेत्राला समर्पित असलेला ‘मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स (मिमा) २०२६’ हा भव्य सोहळा नुकताच उत्साहात आणि दिमाखात पार पडला. महाराष्ट्र आर्ट्स अँड कल्चर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजिलेल्या या सोहळ्याला स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाचे अध्यक्ष रणजीत सावरकर, मंजिरी मराठे, प्रियांका बर्वे, मंदार चोळकर, सावनी रविंद्र, कार्तिकी गायकवाड, अविनाश विश्वजीत यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांत मराठी इंडी संगीताने स्वतःची एक ठळक ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांच्या चौकटीबाहेर पडत, स्वतंत्रपणे संगीतनिर्मिती करणाऱ्या कलाकारांच्या या नव्या लाटेला ‘मिमा’सारख्या व्यासपीठामुळे योग्य ओळख आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे या सोहळ्यात अधोरेखित झाले. गायक, संगीतकार, वादक, गीतकार तसेच तांत्रिक क्षेत्रातील कलावंतांचा सन्मान करून इंडी संगीताच्या सर्वांगीण प्रवासाचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्यात शास्त्रीय संगीत आणि भजनासाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गीतकार गुरु ठाकूर आणि गायिका बेला शेंडे यांना ‘मराठी इंडी म्युझिक आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बासरीवादनातील उत्कृष्टतेसाठी अमर ओक यांना ‘एक्सलेन्स इन म्युझिक अवॉर्ड’, तर तांत्रिक क्षेत्रातील योगदानासाठी प्रमोद चांदोरकर यांना ‘टेक्निकल एक्सलेन्स इन म्युझिक अवॉर्ड’ देण्यात आला. ‘सोबतीचा करार’ या कार्यक्रमाला ‘आयकॉनिक म्युझिक शो’चा मान मिळाला, तर अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या अल्बमला ‘आयकॉनिक म्युझिक अल्बम’ म्हणून गौरविण्यात आले.

विशेष कामगिरीची दखल घेत आकाश देशमुख (टेंभुर्णी) यांना ‘विशेष दिव्यांग कलाकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर परदेशात मराठी संस्कृतीचा ठसा उमटवणाऱ्या व्ही. रमेश (सौदी अरब) यांना ‘प्रवासी मराठी कलाकार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

या उपक्रमाबाबत आयोजक अजय नाईक म्हणाले, ”आजचा ‘मिमा’ सोहळा म्हणजे केवळ पुरस्कार वितरण नाही, तर मराठी इंडी संगीताच्या वाढत्या सामर्थ्याचा उत्सव आहे. स्वतःच्या बळावर उभं राहिलेलं हे संगीत आता केवळ पर्याय राहिलेलं नाही, तर मुख्य प्रवाहात आपली जागा निर्माण करत आहे. आमचा उद्देश केवळ पुरस्कार देण्यापुरता मर्यादित नाही, तर या कलाकारांना दीर्घकालीन व्यासपीठ, योग्य ओळख आणि उद्योगाशी जोडणं हा आहे. ‘मिमा’च्या माध्यमातून मराठी इंडी संगीताला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न पुढेही सुरू राहील.”

‘मिमा २०२६’मुळे मराठी इंडी संगीताला नवा आत्मविश्वास आणि व्यापक व्यासपीठ मिळाल्याची भावना यावेळी उपस्थित कलाकार आणि रसिकांमध्ये पाहायला मिळाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 8 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे