कृषीवार्ता
कृषिविभागाच्या विविध योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) शेतकरी बांधवांना बंधनकारक : रामदास मडके

0
3
2
1
2
3
कृषिविभागाच्या विविध योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र ( फार्मर आयडी) शेतकरी बांधवांना बंधनकारक : रामदास मडके
इगतपुरी ( प्रतिनिधी ) – केंद्रशासन व महाराष्ट्र शासन याच्या संयुक्त शेतकरी ओळखपत्र योजनेच्या माध्यमातून शेतकरी ओळखपत्र ( फार्मर आयडी ) शेतकरी बांधवांना बंधनकारक असून 31 मार्च पर्यंत जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आपला शेतकरी ओळख क्रमांक लवकरात लवकर तयार करून घ्यावा असे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषिअधिकारी रामदास मडके यांनी केले.
कृषी विभागाच्या पीएम किसान, पीकविमा महा डीबीटी पोर्टलवरील योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ( पोक्रा ) नसर्गिक अनुदान, पीक कर्ज, यासारख्या इतर सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अँग्रीस्टेक प्रकल्पाअंतर्गत शेतकरी ओळखपत्र ( फार्मर आयडी ) शेतकरी बांधवांना बंधनकारक असून, भारत सरकारद्वारे शेतकरी फार्मर आयडी तयार करण्याचे काम सुरु असून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे तालुका कृषीअधिकारी रामदास मडके यांनी सांगितले.
0
3
2
1
2
3