Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगसामाजिक

अशोका मेडिकव्हर मधील ओपीडी विभागांना नवी ओळख — रुग्णांच्या सोयीसाठी फुलांच्या क्लस्टरनुसार नाविकरण

0 4 2 9 5 7

अशोका मेडिकव्हर मधील ओपीडी विभागांना नवी ओळख — रुग्णांच्या सोयीसाठी फुलांच्या क्लस्टरनुसार नाविकरण

रुग्ण व नातेवाईकांना आवश्यक विभाग शोधणे अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे ओपीडी विभागांचे पुनर्नामिकरण करून त्यांना फुलांच्या क्लस्टरनुसार ओळख देण्यात आली आहे.

🌹 क्लस्टर गुलाब (Rose) – कार्डियोलॉजी, न्युरो, नेत्ररोग, दंतचिकित्सा, हेल्थ चेकअप इत्यादी.
🌸 क्लस्टर ऑर्किड (Orchid) – जनरल मेडिसिन, ईएनटी, ऑर्थोपेडिक्स, डायबेटीस, फार्मसी इत्यादी.
🌺 क्लस्टर लिली (Lily) – पचनसंस्थेचे आजार, गॅस्ट्रोएन्टरोलॉजी, बॅरिएट्रिक सर्जरी, लिव्हर ट्रान्सप्लांट इत्यादी.
🌼 क्लस्टर डेझी (Daisy) – पेडियाट्रिक्स, निओनॅटॉलॉजी, लसीकरण.
🌷 क्लस्टर कमळ (Lotus) – युरोलॉजी, नेफ्रोलॉजी, डायलेसिस, किडनी ट्रान्सप्लांट इत्यादी.

हा उपक्रम प्रमुख अतिथी श्री. नीरज लाल, रिजनल हेड – महाराष्ट्र आणि कर्नाटक, मेडिकव्हर हॉस्पिटल्स यांच्या हस्ते तसेच केंद्र प्रमुख श्री. अनुप त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,चे रिजनल हेड श्री नीरज लाल यांनी सांगितले की,
“आमचे ध्येय रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा देणे हे आहे. क्लस्टरनुसार नाविकरणामुळे रुग्णांना विभाग शोधणे सोपे होईल आणि त्यांना वेळेची बचत होईल. ही पद्धत एक आधुनिक, रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे नाशिकमधील एक अग्रगण्य मल्टी-सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असून येथे कार्डियाक सायन्सेस, न्युरोसायन्सेस, ऑर्थोपेडिक्स, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, युरोलॉजी, नेफ्रोलॉजी, पीडियाट्रिक्स यांसारख्या विविध विभागांत जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि आधुनिक सुविधा यांच्या मदतीने हे रुग्णालय रुग्णांच्या आरोग्यसेवेत सतत नावीन्य आणत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे