Breaking
ब्रेकिंग

विष्णूनगर जवळ युरियाचा काळाबाजार उघड; लासलगाव पोलिसांची धाड, ८८.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0 4 7 8 4 4

विष्णूनगर जवळ युरियाचा काळाबाजार उघड; लासलगाव पोलिसांची धाड, ८८.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

विंचूर, ता. २  लासलगाव पोलिसांनी विष्णूनगर (ता. निफाड) येथे युरियाचा कथित काळाबाजार करणाऱ्या रॅकेटवर धाड टाकून ८८ लाख ३६ हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, खत नियंत्रण आदेश तसेच भारतीय न्याय संहिता-२०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी, पंचायत समिती निफाड संदीप मोगल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर दगु पवार (वय ३७, रा. इंदिरानगर, विंचूर) व सागर किशोर गरड (वय २७, रा. सुभाषनगर रोड, विंचूर) यांच्याविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

         शनिवार ता. १  रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विष्णूनगर येथील हॉटेल न्यू क्रांतीच्या पाठीमागील कांद्याच्या खळ्यात ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनुदानित असलेल्या २६४ युरिया गोण्या, औद्योगिक वापरासाठी असलेल्या ४६४ टेक्निकल ग्रेड युरिया गोण्या, एक आयशर टेम्पो, एक टाटा ट्रक, रिकाम्या गोण्या, गोण्या शिवण्याचे मशीन तसेच तीन मोबाईल फोन असा एकूण ८८ लाख ३६ हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

           आरोपींनी संगनमत करून शेतकऱ्यांसाठी अनुदानित युरिया खताचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. व्ही. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली API सागर कोते, PSI किरण साळुंके,HC अरुण डोंगरे, HC उत्तम गोसावी, PC सागर आरोटे, PC अवधूत होंडे, PC संदीप डगळे, PC कैलास घोलप, सह कृषी विभाग कडील पथक संदीप मोगल, दीपक सोमवंशी, हितेश पगार यांनी केली.

या कारवाईत लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 8 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे