Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

लाखो रुपयाच्या गुटख्यासह ‘गुटखामाफिया’ अटकेत

0 3 2 0 2 8

नांदगाव पोलिसांची ‘दबंग’ कामगिरी..

लाखो रुपयाच्या गुटख्यासह ‘गुटखामाफिया’ अटकेत

नांदगाव (मारुती जगधने) –

कुठेही नाही सापडला मात्र नांदगाव पोलिसांनी पकडला..

लाखो रुपयांचा गुटखा राजरोजपणे घेऊन जाणार्‍या गुटखा माफियाला नांदगाव पोलीसांनी शिताफिने पिकअप वाहनासह पकडले. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात कुतूहल व्यक्त केले जात असून नांदगाव पोलीसांचे कौतुक केले जात आहे. निफाड तालुक्यातील विंचूर येथील गुटखामाफियाला एवढे धाडस कुठून आणि कसे आले असेल? नक्की एवढ्या बिनधास्तपणे लाखो रुपयांचा गुटखा या टोकाकडून त्या टोकाकडे घेऊन जाण्यासारखे अग्निदिव्य कसे साध्य होते. मोठ-मोठ्या हप्तेखोरांचा संबंध असणार यात शंका नाही मात्र या गुटखामाफियाला ’अपवाद’ भेटले ते नांदगाव पोलीस स्टेशनचे ’दबंग’ पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी आणि त्यांची टीम ज्यांच्यापुढे कुठलेही आमिष चालले नाही आणि अखेर गुटखामाफिया जेरबंद झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना नांदगाव येथे संशयितरित्या वाहतूक करताना एक बोलोरो (पिक-अप) टेम्पो मिळून आला. अधिक तपासणी केली असता त्यात 16 लाख 39 हजार रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू व गुटखा नांदगाव पोलिसांच्या हाती लागला. नांदगाव पोलिसांनी गाडी चालक महेश रमेश आहेर राहणार पांडुरंग नगर, विंचूर, तालुका निफाड तर दुसरा आरोपी निलेश दिलीपपचंद बोथरा राहणार पोतनीस पार्क, विंचूर तालुका निफाड, जि. नाशिक यांनी दिनांक 6-6-2025 रोजी मध्यरात्री एक पाच वाजता नांदगाव-साकोरा रस्त्यावर नेत असतांना साकोरा शिवारात पोलीसांच्या हाती हा टेम्पो लागला. दरम्यान मिळालेला मालचोवीस हजार दोनशे रुपये किमतीचा केशरीयुक्त व्ही वन तंबाखूचे 1100 पुढे प्रत्येकी पुड्याची किंमत 22 रुपये किलो, त्यानंतर 63 हजार रुपये किमतीचे व्हीआय तंबाखू 2100 पुढे प्रत्येकी पुढे ची किंमत तीस रुपये प्रमाणे, त्यानंतर दोन लाख 17 हजार आठशे रुपये किमतीचे केसरी युक्त विमल पान मसाला चे 2200 पुढे प्रत्येक पुढे ची किंमत 198 रुपये प्रमाणे, त्यानंतर दहा लाख 34 हजार रुपये किंमतीचे केसयुक्त विमल पान मसाल्याचे 2200 पुडे प्रत्येकी पुढे ची किंमत 470 रुपये, त्यानंतर तीन लाख रुपये किमतीचे एक सफेद रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीचा नंबर एम एच एकोणावीस बी एम झिरो आठ 23 असे एकूण 16 लाख 39 हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा व संशयित आरोपी यांनी सदर बोलोरो गाडीमध्ये विनापरवाना महाराष्ट्र प्रतिबंधित असलेल्या सुगंधित पानमसाला सुगंधित तंबाखू असे एकूण 16 लाख 39 हजार रुपये किमतीचे अवैध गुटखा वाहतूक करताना मिळून आले म्हणून नांदगाव पोलिसात यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे.

घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पीएसआय संतोष बहाकर, पोलीस हवालदार मोरे, व दत्तात्रय सोनवणे करीत आहेत. गुटख्या विरोधात एवढे कायदे कडक असतांना गुटखामाफियांमध्ये एवढे धाडस नक्की कुणामुळे येते? अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासन यांचे उच्चस्तरावर काही लागेबंदे तर नाही ना असा कायमचा अनुत्तरित प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे.

4.5/5 - (2 votes)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 0 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे