
0
2
5
5
5
9
बिटको महाविद्यालयाची विद्यार्थीनी संजना जगताप हिला हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्णपदक….
नाशिकरोड : वार्षिक क्रीडा महोत्सव , अश्वमेध कप,चंद्रपूर, येथे झालेल्या व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाच्या संजना जगताप हिने व्हॉलिबॉल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले….. त्याबद्दल संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी तसेच व्यवस्थापन विभाग प्रमुख शैलेश गोसावी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी तसेच कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.आकाश ठाकूर आणि विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. कल्याणराव टकले सर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच तिला प्रा.धनंजय बर्वे आणि प्रा.महेश थेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या..
द्वारा – श्री. संजय परमसागर, नाशिकरोड
0
2
5
5
5
9