*चांदवड प्रतिनिधी:*
दिघवद ता. चांदवड येथे लहान बाळ विहिरीत पडल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही विहिरीत तोल जाऊन मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दिघवद बोपाने शिवारात पूजा दौलत गांगुर्डे वय 26 आपल्या विहिरीवर ड्रीप इरिगेशनचे कॉक फिरवत असताना सोबत असलेला दोन वर्षांचा मुलगा शिवांश हा विहिरीत पडल्याने त्यास वाचविण्याच्या घाई गडबडीच्या प्रयत्नात आई पूजाचाही विहिरीत तोल जाऊन पाण्यात बुडुन दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते. दोन वर्षांपूर्वी विहीर खोदलेली असल्याने अजून विहिरीचे बांधकाम केलेले नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली. सध्या पावसाळा असल्याने विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली होती. त्यामुळे दोन्हीही मृतदेह सापडण्यास बराच वेळ गेला. आईचा मृतदेह दुपारी सापडला. तर मुलगा शिवांशचा मृतदेह खोल पाणी असल्याने सापडत नसल्याने अखेर पाच मोटारींच्या साह्याने विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात येऊन त्याचा मृतदेह रात्री उशिरा सापडला. दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून चांदवड पोलीस स्थानकाचे पोलीस पुढील तपास करत आहे.