Breaking
अपघातई-पेपरसामाजिक

नायलॉन मांजामुळे महिला पोलीस हवालदार जखमी

0 3 2 1 2 3

मनमाड/प्रतिनिधी -: महिला पोलीस हवालदार आपली दैनंदिन सेवा बजावून येवलाकडून मनमाडकडे येत असतांना अंकाई शिवारात पतंगचा मांजाने गळा चिरून त्या जखमी झाल्या. रेखा फडताळे यांना मनमाड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचार घेण्यासाठी नाशिक येथे हलवण्यात आले.


घटनेची माहिती मिळताचडीवायएसपी बाजीराव महाजन, शहर पोलीस निरीक्षक विजय करे, पोलीस हवालदार संदीप झाल्टे, रणजित चव्हाण राजु खैरनार आदिंनी उपस्थित होऊन जखमी अवस्थेत असलेल्या रेखा फडताळे यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यास सहकार्य केले.
नायलॉन मांजा म्हणजे हा इतका घातक होता की ज्या रुग्णवाहिकेतून पेशंटला नाशिकला हलवले होते त्याच्या बोनट जवळील रॉडला सुद्धा कापले गेले असल्याचे दिसुन आले होते.अंकाई जवळ लेडीज पोलीस शिपाई रेखा फडताळे पडल्या असता त्या भागातील एका मोटरसायकलस्वाराने रेखा फडताळे यांना उचलुन दुचाकीवर बसवून कमरेला बांधून तिला मनमाड शहर शासकीय रुग्णालयात घेऊन आला होता. या बद्दल मनमाड शहरातील नागरिकाकडुन कौतुक होत आहे.
दरम्यान, पोलीस हवालदार रेखा फडताळे यांचा वेळेवर उपचार झाला म्हणून त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती पोलीस हवालदार संदीप झाल्टे, रणजित चव्हाण यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे