Breaking
ई-पेपरदेश-विदेशनोकरीशैक्षणिक

वॉलमार्ट वृद्धीचा एमएसएमईंना मोफत डिजिटल प्रशिक्षण आणि व्यावसायिक साधनांचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र उद्योग संचालनालयाशी सहयोग

0 4 4 8 0 0

वॉलमार्ट वृद्धीचा एमएसएमईंना मोफत डिजिटल प्रशिक्षण आणि व्यावसायिक साधनांचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र उद्योग संचालनालयाशी सहयोग

नाशिक – वॉलमार्ट वृद्धीने आज महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाबरोबर त्यांच्या उपक्रम भागीदार आयडियाज टू इम्पॅक्ट फाउंडेशनच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.ही भागीदारी संपूर्ण महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) वाढीच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. डिजिटल शिक्षण सुविधा आणि व्यवसाय साधने देऊन एमएसएमईंना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तार, व्याप्ती वाढवण्यास आणि प्रगती करण्यास मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मुंबई येथे एक एप्रिल रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून भारतातील एक लाख एमएसएमईंना २०२८ पर्यंत सक्षम करण्याच्या वॉलमार्ट वृद्धीच्या मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे.

या सहकार्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एमएसएमईंना त्यांची उद्योग क्षमता बळकट करण्यासाठी आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी मोफत वॉलमार्ट वृद्धी प्रशिक्षण आणि डिजिटल साधने उपलब्ध होतील. वॉलमार्ट वृध्दीच्या प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या प्रयत्नांचा राज्यभरातील उद्योजकांना फायदा देण्यासाठी उद्योग संचालनालय आपल्या जिल्हा उद्योग केंद्रांद्वारे (डीआयसी) या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवेल. हा उपक्रम वस्त्रोद्योग, हस्तकला, कृषी प्रक्रिया, चामड्याच्या वस्तू, तयार कपडे, रेशीम, फर्निचर, दागिने, मिठाई आणि पितळी धातू उत्पादने अशा प्रमुख उद्योगांवर लक्ष केंद्रित करेल. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन म्हणाले की, एमएसएमई ही महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमागील प्रेरक शक्ती आहे, जी औद्योगिक वाढ, रोजगार निर्मिती आणि आपल्या राज्याची व्याख्या करणाऱ्या उद्योजकतेच्या भावनेत लक्षणीय योगदान देते. भविष्यासाठी सज्ज एमएसएमई वातावरणाला चालना देण्यासाठी आणि छोट्या व्यवसायांना आजच्या बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांनी सुसज्ज करण्यासाठी वॉलमार्ट वृद्धीबरोबरचे आमचे सहकार्य महाराष्ट्र सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित करते.”

वॉलमार्टच्या स्त्रोत आणि खरेदी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष जेसन फ्रेमस्टॅड म्हणाले, “एमएसएमई क्षेत्र भारताच्या आर्थिक वाढीच्या सर्वात मजबूत प्रेरकांपैकी एक आहे. ते उद्योजकांच्या कल्पकता आणि चिवटपणाने चालते. “या भागीदारीच्या माध्यमातून वॉलमार्ट वृद्धी एमएसएमईंना त्यांची क्षमता उलगडण्यासाठी सक्षम करत आहे. डिजिटल साधने, व्यवसाय प्रशिक्षण आणि बाजारपेठेत प्रवेश देऊन करून, हा कार्यक्रम स्थानिक उद्योगांना त्यांची स्पर्धात्मकता वाढवण्यास आणि स्थानिक प्रभावाचे राष्ट्रीय आणि जागतिक संधींमध्ये रूपांतर करण्यास सक्षम करतो.”

महाराष्ट्रभरातील उद्योजक त्यांच्या व्यवसायाचे आधुनिकीकरण करण्यासाठी, डिजिटल क्षमता बळकट करण्यासाठी आणि व्यापक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी वॉलमार्ट वृद्धीचा लाभ घेत आहेत. राज्यातील यशोगाथा या कार्यक्रमाचा मूर्त परिणाम अधोरेखित करतात. उदाहरणार्थ, ऑनलाईन बेचो या वेगाने वाढणाऱ्या डिजिटल रिटेल कंपनीचे सह-संस्थापक हर्षल गडा यांनी वॉलमार्ट वृद्धीचा वापर ब्रँड पोझिशनिंग सुधारण्यासाठी, पुरवठा साखळी व्यवस्थित करण्यासाठी आणि डिजिटल रिटेल ऑपरेशन्सचे प्रमाण वाढवण्यासाठी केला. वैयक्तिकृत मार्गदर्शनामुळे साधनसामुग्री योग्य प्रकारे वापरण्यास आणि उत्पादन विस्तार करण्यास मदत झाली. त्यामुळे कंपनीला जागतिक बाजारपेठेत दर्जेदार भारतीय उत्पादने आणता आली.

अनिंदिता चौधरी यांच्या नेतृत्वाखालील इकोसर्व्ह इंडिया हा एक शाश्वत, महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रम आहे, जो नैसर्गिक धागे आणि जबाबदारीने मिळवलेल्या सामग्रीपासून पर्यावरणास अनुकूल हस्तकला उत्पादने तयार करतो. व्यवसायांनी निसर्ग आपल्याला जितके देतो तेवढेच परत द्यावे या विश्वासावर आधारित असलेल्या इकोसर्व्ह इंडियाला वॉलमार्ट वृद्धीच्या पाठिंब्याचा फायदा झाला. या कार्यक्रमाने कंपनीची डिजिटल चॅनेल, उत्पादन स्थिती आणि कार्यान्वयन कार्यक्षमता यांची समज वाढवली. त्यामुळे त्यांच्या सुमारे ९० टक्के महिला असलेल्या कारागीरांना मोठ्या बाजारपेठेत आत्मविश्वासाने पोहोचता आले.

वॉलमार्ट वृद्धी २०१९ मध्ये सुरू झालेला एक पुरवठादार विकास कार्यक्रम आहे. तो भारतातील एमएसएमईंना आधुनिकीकरण, प्रमाण आणि त्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे. वॉलमार्टचे जागतिक पुरवठा साखळीतील कौशल्य आणि फ्लिपकार्टची देशव्यापी ई-कॉमर्स पोहोच एकत्र आणून हा कार्यक्रम एमएसएमईना वित्त, मार्केटिंग, मनुष्यबळ व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स आणि बरेच काही यावर विनामूल्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि व्यवसाय सल्ला देतो. वॉलमार्ट वृद्धीने आपल्या स्थापनेपासून भारतातील ७० हजारहून अधिक एमएसएमईंना यशस्वीरित्या प्रशिक्षण दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 8 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे