सामाजिक
सप्तशृंगी गडावर फ्युनिक्युलर रोप वे जोमात, मात्र ग्रामस्थ कोमात

0
4
2
9
5
7
सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड
फ्युनिक्युलर रोपवे मुळे सप्तशृंगी गडावरती उपासमारीची वेळ गडावरील ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतला निवेदन
सप्तश्रृंगी गड (ता. कळवण, जि. नाशिक) येथे शिवालय तलाव परिसरात स्थानिक बस स्थानक सुरू करण्याची मागणी प्रलंबित राहिल्यामुळे आदिवासी समाज उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे, असा गंभीर आरोप ग्रामस्थ व आदिवासी समाजाकडून करण्यात आला आहे.
रोपवे प्रकल्प सुरू झाल्यानंतर भाविक थेट दर्शनासाठी जात असल्याने गावातील आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. साडी-ओटी, नारळ, फुले व पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या आदिवासी महिलांचा रोजगार संपुष्टात आला असून अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवण हे अनिश्चित झाले आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की घर चालवण्यासाठी कर्ज काढणे हाच पर्याय उरला असून अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, आदिवासी समाजाला विश्वासात न घेता स्थानिक पातळीवर काही व्यक्ती परस्पर निर्णय घेत आहेत, ज्यामुळे गावातील लोकांचा आवाज दाबला जात आहे. हे प्रकार थांबवून आदिवासी समाजाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या मते, शिवालय तलाव परिसरात बस स्थानक सुरू झाल्यास भाविकांची ये-जा गावामधून होईल, स्थानिक व्यवसाय सुरू होतील आणि आदिवासी महिलांना पुन्हा रोजगार मिळेल. मात्र, प्रशासन व संबंधित विभागांकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
“हा प्रश्न आता विकासाचा नसून जगण्याचा आहे,” असे सांगत ग्रामस्थ व आदिवासी समाजाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, तातडीने निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची व सप्तशृंगी गड ग्रामपंचायत ची असेल .
.श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी रोपवे झाले तेव्हापासून सप्तशृंगी गड गावामध्ये कुठलाही भाविक फिरकत नसल्यामुळे सप्तशृंगी गडावरील दुकानदार हॉटेल पूजा साहित्य व्यवसायिक यांच्या वरती उपासमारीची वेळ आलेली आहे सदर रोपवे विरोधात अनेक वेळेस आंदोलन करण्यात आली परंतु कुठलाही उपयोग झाला नाही आदिवासी बांधवांकडे कुठलाही पैसा नाही आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कुठली किंमत नाही असे वक्तव्य या ठिकाणी असलेले आदिवासी बांधव करत आहे त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर न्याय देऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेली पार्किंग कमी करून शिवालय तलावाकडे त्वरित बस स्थानक करावे भाविकांची येणारी खाजगी वाहने शिवालय तलाव परिसरामध्ये ग्रामपंचायतचे पार्किंग केली आहे त्या पार्किंग मध्ये उभे करावे जेणेकरून या ठिकाणी येणारे भाविक शिवालय तलाव वाहने पार्किंग करून पायरी पर्यंत पाई येतील म्हणजे गावातील जे व्यवसाय काय त्यांच्या दुकानातलं कुठल्याही प्रकारचे पूजा साहित्य गेले तर त्यांचे उदरनिर्वाह होईल असे मत गडावरील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे
0
4
2
9
5
7



