Breaking
आरोग्य व शिक्षण

मणक्याचे आरोग्य जपा, वेदनामुक्त जीवनाचा संकल्प करा!

जागतिक स्पाइन दिनानिमित्त डॉ. शेखर चिरमाडे यांचे नागरिकांना आवाहन

0 5 1 9 5 6

मणक्याचे आरोग्य जपा, वेदनामुक्त जीवनाचा संकल्प करा!

जागतिक स्पाइन दिनानिमित्त डॉ. शेखर चिरमाडे यांचे नागरिकांना आवाहन

नाशिक : मणका हा मानवी शरीराचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असून शरीराची हालचाल, संतुलन आणि दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, बदलती जीवनशैली, दीर्घकाळ एकाच जागी बसून काम करणे, चुकीची बैठक, व्यायामाचा अभाव आणि वाढता मोबाईल व संगणकाचा वापर यामुळे मणक्याशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मणक्याच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील ज्येष्ठ मेंदू व मणक्याचे शल्यविशारद डॉ. शेखर चिरमाडे यांनी जागतिक स्पाइन दिनानिमित्त व्यक्त केले.
पाठदुखी, मानदुखी, कंबरेतून पायाकडे जाणारी वेदना, हातापायांना मुंग्या येणे किंवा अशक्तपणा जाणवणे ही मणक्याशी संबंधित समस्यांची लक्षणे असू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास अनेक रुग्णांना वेदनांपासून आराम मिळू शकतो आणि दैनंदिन जीवन अधिक सुलभ होऊ शकते.
मणक्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमित व्यायाम, योग्य पद्धतीने बसणे व उभे राहणे, वजन नियंत्रणात ठेवणे, जड वस्तू उचलताना योग्य तंत्राचा वापर करणे आणि कामाच्या दरम्यान नियमित विश्रांती घेणे आवश्यक आहे. तसेच, सतत पाठदुखी होत असल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये मणक्याशी संबंधित विविध समस्यांचे निदान आणि उपचारांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. मणक्याच्या आरोग्याबाबत जागरूक राहून वेदनामुक्त आणि निरोगी जीवन जगण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन डॉ. शेखर चिरमाडे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 9 5 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे