बाळासाहेब सोनवणे सर यांचा दिव्यांग संघटनेकडून सत्कार
नाशिक:प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 नाशिक जिल्हा शाखेच्यावतीने
दि.3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन नाशिक रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी निफाड तालुक्यातील मांजरगाव येथील भूमिपुत्र,महिरावणी येथील मातोश्री गि. दे. पाटील माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक,डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन जिल्हा समन्वयक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/अधिकारी संघटना नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब दादा सोनवणे सर यांचा शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक,दिव्यांग इ. विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल नाशिक जिल्हा शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सर यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार राज्यसचिव ललित सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील, राज्य उपाध्यक्ष नंदू देवरे,जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराड,दिव्यांग पतसंस्था चेअरमन सतीश लाड,सचिव राजेंद्र खैरनार,राज्यसंचालक सिंधुताई जाधव,कोषाध्यक्ष रामदास वाघ,सोमा भालनोर, दिव्यांग पतसंस्था सचिव मनोहर नेटावटे,जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे,मारुती आव्हाड आदींसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.
0
1
6
0
8
8
0
1
6
0
8
8