कारवर पेट्रोल टाकून सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न*
.???? *बीडनंतर तुळजापूर हादरलं; कारवर पेट्रोल टाकून सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न*
किरण घायदार….
*धाराशिव-* बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच बीडच्या प्रकरणाची पुनरावृत्ती वाटावी अशी घटना धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यात घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम मध्यरात्री गाडीने प्रवास करत होते. गाडीत त्यांचा भाऊ देखील होता. तेव्हा अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. दगडांनी काचा फोडून, गाडीत पेट्रोल टाकून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला गेला. या हल्ल्यामध्ये नामदेव निकम थोडक्यात बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव निकम बारुळ गावातून मेसाई जवळगा गावच्या दिशेने जात होते. त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी दोन बाईक आल्या.
बाईकवरचे लोक हॉर्न वाजवत होते. त्यांना पुढे जायचे आहे असं समजून नामदेव यांनी गाडीचा वेग कमी केला. लगेच त्या बाईकस्वारांनी डाव्या दरवाजाची काच दगडाने फोडली आणि पेट्रोलचे फुगे गाडीत टाकले. आम्ही गाडीचा वेग वाढवला. तेव्हा बाईकवरच्या गुंडांनी आमच्या गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकली. अंड्यांमुळे काच खराब झाल्याने आम्हाला गाडीचा वेग कमी करावा लागला. त्यानंतर बाईक जवळ आणत गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला’, असा घटनाक्रम नामदेव निकम यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितला.