Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

श्रमातून देश घडवणाऱ्या सफाई कामगाराची व्यथा ‘अवकारीका’च्या ट्रेलरमधून समोर

0 4 2 9 5 7

श्रमातून देश घडवणाऱ्या सफाई कामगाराची व्यथा ‘अवकारीका’च्या ट्रेलरमधून समोर

माणुसकी काय असेल याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘अवकारीका’ चित्रपट, ट्रेलर पाहून मिळतेय कौतुकाची थाप

स्वच्छतेचा गुरुमंत्र देत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणाऱ्या ‘अवकारीका’ या चित्रपटाची बरेच दिवसांपासून चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. अर्थातच या समोर आलेल्या ट्रेलरमधून एक दुर्लक्षित सत्याचा खुलासा झाला आहे. ज्यांच्या श्रमातून देश घडतो अशा कचरा वेचून परिसर स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगाराची व्यथा ‘अवकारीका’ या चित्रपटातून १ ऑगस्टपासून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

माणसाने माणूसपण जपावे याची आठवण या चित्रपटात करून दिली आहे. कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणाला उद्योगीकरण, वाढती लोकसंख्या या  समस्या जबाबदार असल्या तरी आपण स्वतः या सगळ्याचे मूळ आहोत याची जाणीव चित्रपटाचा ट्रेलर पाहून होतेय. दिवस-रात्र आपला परिसर स्वच्छ दिसावा म्हणून कचरा उचलणाऱ्या एका कर्मचाऱ्याची व्यथा ‘अवकारीका’ चित्रपट मांडणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून अर्थातच चित्रपटाच्या कथेला नागरिक व समस्त प्रेक्षक वर्गाकडून कौतुकाची थाप मिळत आहे. अल्पावधीतच ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच स्वच्छता भारत अभियानाने चित्रपटाला पाठींबा दिला आणि केंद्र सरकारनेही या चित्रपटाला, चित्रपटाच्या कथेला, कन्सेप्टला दुजोरा दिला आहे.

रेडबड मोशन पिक्चर’ या बॅनर अंतर्गत ‘अवकारीका’ हा चित्रपट येत्या १ ऑगस्ट पासून रसिकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तमरित्या पेलवली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी सांभाळली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे. अभिनेता विराट मडके चित्रपटात स्वच्छता दूताच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात राहुल फलटणकर, रोहित पवार आदी कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीत अरविंद भोसले यांचे असून छायांकन करण तांदळे तर संकलन अथर्व मुळे यांचे आहे. सहदिग्दर्शक रहमान पठाण तर लाईन प्रोड्यूसर म्हणून चेतन परदेशी यांनी बाजू सांभाळली आहे. श्रेयस देशपांडे यांचे संगीत असून गायक कैलास खैर, सुनिधी चव्हाण, ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील विविध गीतांना लाभले आहेत. या चित्रपटाचे बीजीएम साऊथ म्युझिकद्वारे करण्यात आले आहे. येत्या १ ऑगस्टला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे