Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरसामाजिक

संसर्गजन्य कावीळ किंवा हिपॅटायटिसचा फैलाव: लक्षणं ओळखा, उपचार घ्या

डॉ. अमोल शिंदे अशोका मेडिकव्हर नाशिक

0 4 2 9 5 7

संसर्गजन्य कावीळ किंवा हिपॅटायटिसचा फैलाव: लक्षणं ओळखा, उपचार घ्या

** डॉ. अमोल शिंदे अशोका मेडिकव्हर नाशिक
*
डॉ.अमोल शिंदे एम.बी.बी.एस.डीएनबी (जनरल मेडिसिन), डीएनबी (मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) (संचालक – हेपाटोलॉजी आणि एंडोस्कोपी ) हे अशोका मेडिकवर येथे कार्यरत आहेत. अशोका मेडिकव्हर रुग्णालय पचनसंस्था विभागासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून सर्व प्रकारच्या उपचार आणि शस्त्रक्रिया येथे कुशलतेने करण्यात येतात.

डॉक्टरांच्या मते कावीळ म्हणजेच जॉनडिस. कावीळ ही लिव्हरच्या रचनेत किंवा कार्यात बाधा झाल्यास होते.
भारतात दरवर्षी अनेक लोकांना संसर्गजन्य कावीळ होते. यालाच व्हायरल हेपेटाइटिस असे म्हणतात. जनसामान्यासाठी हा आजार जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण हा आजार टाळता येतो.

हेपॅटायटीस म्हणजे काय

पाच प्रकारच्या विषाणूंच्या प्रादुर्भावाने यकृतावर आलेली सूज व त्यामुळे होणाऱ्या काविळीला हेपेटाइटिस म्हणतात.देशात अनेक लोक व्हायरल हेपेटाइटिस झाल्यावर घरगुती उपचार किंवा झाडापाला खातात व अश्या उपचाराने रुग्ण अत्यवस्थ म्हणजे जास्त खराब होतात. काहीजण मृतही पावतात.

हेपेटाइटिसचा प्रसार कसा होतो

हेपेटाइटिस ए व इ हे पाणी व दूषित अन्न यामार्फत यकृत व शरीराला इजा पोहचवतात. विशेषता पावसाळ्यात हा आजार फार जणांना होतो. हाताला पाणी लागले म्हणजे ते स्वच्छ झाले असा एक गैरसमज आहे. भांड्यातले पाणी स्वच्छ दिसले म्हणजे ते स्वच्छ आहे असे नाही. हे विषाणू अश्या पाण्यात असू शकतात. हेपेटाइटिस बी व सी हे रक्तसंक्रमणाद्वारे होतात.

हेपेटाइटिस ची लक्षणे
भूक कमी होणे
मळमळ होणे
थकवा येणे
उलट्या होणे
कधी कधी जुलाब व अंगदुखी
लघवी पिवळी होणे
डोळे पिवळे दिसणे

कधी कधी काही रुग्णांमध्ये जास्त परिणाम होऊन लिवर हे पूर्णपणे फेल किंवा अकार्यक्षम होऊ शकते. अशावेळी असंबद्ध बडबड करणे, फार झोपणे किंवा रुग्ण कोमात जाणे असे घडू शकते. यालाच आपण कावीळ मेंदूत गेली असे म्हणतो.

व्हायरल हेपेटाइटिस (संसर्गजन्य कावीळ) कशी टाळावी

पावसाळ्यात घराबाहेर खाणे टाळावे
उकळून थंड केलेले पाणी प्यावे
जेवणापूर्वी हात स्वच्छ पाण्याने व साबणाने धुवावे
शौचास जाऊन आल्यावर हात स्वच्छ पाण्याने व साबणाने धुवावे
हॉटेलमध्ये खाताना उकळलेले किंवा शिजवलेले अन्नपदार्थ खावे
जास्तकरून बाहेर हॉटेलमध्ये खाणे टाळावे
दाढी करताना नवीन ब्लेड वापरावे

संसर्गजन्य कावीळ झाल्यास रुग्णांनी काय उपचार करावे
घरी बनवलेले ताजे अन्न खावे
कोणतेही पथ्य करू नये
भरपूर आराम करावा
लक्षणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत

लसीकरण आणि हेपेटाइटिस बी व सी विषाणूसाठी आधुनिक उपचार म्हणजे औषधे उपलब्ध आहेत. ही हेपटोलॉजिस्ट म्हणजे लिवर स्पेशलिस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

नाशिकमधील अशोका मेडिकव्हर रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग हा केवळ उत्कृष्टतेचे केंद्र नसून एक शैक्षणिक संस्था देखील आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे