*नाशिक नंदुरबार बसमध्येच महिलेची प्रसूती*

*नाशिक नंदुरबार बसमध्येच महिलेची प्रसूती*
*बाळ व बाळंतीण सुखरूप*
किरण घायदार, नाशिक…
आज बुधवार दि.२५ रोजी नाशिक हून नंदुरबार कडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये एका आदिवासी महिलीची प्रसूती झाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, बागलाण तालुक्यतील वडे दिगर येथील अजित शामा पवार हे आपल्या पत्नी सह व अजून आपल्या एका नातेवाईकांबरोबर सातारा जिल्यातील कऱ्हाड तालुक्यातील एका खाजगी साखर कारखान्यासाठी ऊस तोड कामगार म्हणून गेले असता,
त्याच्या पत्नी पुजाबाई हिचे प्रसूतीचे दिवस पूर्ण होणार असल्यामुळे अजित यांनी कऱ्हाड येथून गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतला ते दोघे व त्यांचे नातेवाईक सोबतीला आले ते कऱ्हाड हून थेट नाशिक येथे आले आणि नाशिक हून पंचवटी डेपोची बस क्रमांक एम एच ४० वाय ५६६८ हि बस नाशिक हून नंदुरबार कडे निघणार होती.या दोघां परिवाराने ताहाराबाद येथे थांबा आहे का असी विचारणा करून वाहकाने होकर दिल्याने हे दोघे परीवार या बस मध्ये चढले. ठीक ११ वाजता नाशिक हून हि बस निघाली असता. रस्त्यात देवळा ते सटाणा या रस्त्याचे दुतर्फा काम चालू असल्यामुळे या रस्त्यात खोप मोठ्या प्रमणात खड्डे पडले आहेत. या पडलेल्या खड्ड्यान मुळे बस मोठ्या प्रमाणात हिंदळत होती. या हिंदळन्यामुळे पूजाबाईस प्रसूती कळा मोठ्याप्रमाणात जाणवू लागल्या.हि बस सटाणा येथे पोहोचण्या अगोदर पूजाबाई हि चालत्या बस मधेच प्रसूत झाली.परिस्थितीचे गांभीर्य बघून बसची महिला वाहक पी.आर.राठोड यांनी चालकास बस एका बाजूला थांबविण्याची विनंती केली, चालकाने देखील बस ताबडतोब हॉटेल पावनखिंड जवळ थांबविली व मधील सर्व प्रवाश्यांना बस रिकामी करण्याची विनंती केली आणि सर्व प्रवाशांनी बस रिकामी केली तसेच वाहक राठोड यांनी बाळ सुख रूप असल्याची खात्री करून घेतली असता त्यांना बाळ व प्रसूत महिला सुखरूप असल्यामुळे हायसे वाटले. योगायोगाणे सटाणा पोलीस चे पोलीस नाईक विशाल जाधव व पोलीस हवालदार रुपेश ठोके हे रस्त्याने जात असताना त्यांना बस थांबलेली दिसली त्यांनी चौकशी केली असता त्यांना सर्व घटना समजली त्यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य बघून त्वरित मदतीला धावून गेले, प्रसूत झालेल्या महिलेस सटाणा ग्रामीण रुग्णालयात पोचविण्यासाठी एका खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनास पाचारण केले व सदर महिलेस ग्रामीण रुग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था केली.सदर प्रसूत महिला पूजा व बाळास सटाणा ग्रामीण रुग्णालयातील डॉ. बामले यांनी महिलेस तपासले त्यानंतर परिचारिका रीना गावित यांच्या मार्फत बाळ व प्रसूत महिलेस नाळ कापून वेगवेगळे केले.बाळ व प्रसूत महिला दोघे हि सुख रूप आहेत.डॉ. बामले यांच्या सह परिचारिका रीना गावित यांच्या सह कर्मचारी विशाल सूर्यवंशी व वसंत अहिरे हे दोघांची काळजी घेत आहेत.हि घडलेली सर्व घटना जरी समाधान कारक दिसत असली तरी याची दुसरी बाजू हि जरा संतापजनक अशीच आहे, त्याचे कारण हि तसेच आहे एक महिला प्रवासी बस मध्ये प्रसूत होते आणि त्या महिलेला थेट रुग्णालयात न घेऊन जाता बस मधून उतरवून एका खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या अप्पे रिक्षा मध्ये बसविले जाते आणि रुग्णालयात दाखल केले जाते ही सर्व व्यवस्था बघता मधल्या वेळेत दोघांपैकी कोणाच्यातरी जीवाला धोका झाला असता, सरळ बस थेट रुग्णालयात घेऊन गेले असते तर महामंडळाची अधिकच वाहवा झाली असती परंतु तसे न करता महिलेला एका खाजगी वाहनात रुग्णालयात दाखल केले गेले आणि तीच बस सटाणा डेपो मध्ये स्वच्छ करण्यासाठी येते आणि त्यांचा मार्गही तोच होता परंतु तसे न करता आपली जबाबदारीची जाण न ठेवता जबाबदारीतून मुक्त कसे होता येईल याकडेच जास्त लक्ष दिले गेले आणि तेही एका महिलेकडूनच या एका आदिवासी जोडप्याच्या जागेवर एखादे सुशिक्षित जोडपे असते किंवा कायद्याची समज असलेले कुणी असते तर बस थेट ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली असती यावरून असे आकलन होते की प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीतून मुक्त होण्याचाच मार्ग निवडलेला दिसतोय जर बाळ व प्रस्तुत महिला यांच्यापैकी कुणाच्याही जीवाला धोका निर्माण झाला असता तर याला कोण जबाबदार असते महामंडळाची बस मधील चालक, वाहक कि पोलीस कर्मचारी किंव्हा रिक्षा चालक यांच्यापैकी कुणाला जबाबदार धरले गेले असते सुदैवाने तसे काही घडले नाही परंतु भविष्यात असे न घडो, बस मध्ये घडलेल्या किरकोळ वादातून बस थेट पोलीस स्टेशनला घेऊन गेल्याच्या सटाणा शहरात अनेकदा घटना घडलेल्या आहेत परंतु या घटनेत तसे काही घडले नाही यातून भविष्यात तरी बोध घेतील.
अजित पवार,प्रसूत महिलेचा पत* आम्हाला सर्वांनी खूप मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, परंतु आम्हाला बस मधून न उतरवता बस थेट रुग्णालयात आणली असती तर अधिक समाधान मिळाले असते मधील काळात दोघांना खूप मोठा धोका निर्माण झाला असता, आता दोघेही सुखरूप आहेत.-अजित पवार,प्रसूत महिलेचा पती