
0
3
2
1
2
1
हनुमाननगरला वासराचा फडशा
विंचूर येथून जवळचअसलेल्या हनुमाननगर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून फाडशा पाडल्या ची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.हनुमाननगर परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्या धुमाकूळ घालत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हनुमाननगर परिसरात सध्या द्राक्ष, कांदे काढणी सुरू आहेत तसेच रात्रीबेरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावं लागतं,अशातच महिन्यापासून बिबट्याचे दर्शन परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांना झाल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.हनुमाननगर येथील शेतकरी दीपक साहेबराव गुंड ता.२२ शनिवारी रात्री झोपलेले असताना . त्यांच्या गायीच्या वासरावर मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून वासराचा फडशा पाडला. त्यानंतर सकाळपर्यंत बिबट्या वारंवार त्या ठिकाणी फिरुन येत होता.त्यामुळे पाळीव जनावरांची सुरक्षा धोक्यात असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.यामुळे भेदरलेले नागरिकांनी बिबट्याने वासरावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मिडिया वर टाकून गावातील व परीसरात नागरिक एकमेकांना सावध राहण्याचे संंदेश पाठवित आहेत.ज्ञानेश्वर भडांगे यांनी फोन वरून वन विभागाला माहिती दिली.वनविभागाचे अधिकारी जाधव हे तात्काळ येवून पंचनामा केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा. त्यामुळे पुढेे होणारे अनर्थ टाळले जातील. अशी मागणी हनुमाननगर येथील नागरिकांनी केली आहे.
देवगाव जवळील महादेव नगर येथे मोटसायकलवर बिबट्याचा हल्ला एक जण गंभीर जखमी
0
3
2
1
2
1