Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरसामाजिक

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महास्वछता अभियान

0 3 2 1 2 3

लासलगाव व परिसरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महास्वछता अभियान संपन्न

माणसाला माणुसकीची शिकवण देणाऱ्या महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त आज दिनांक २ मार्च रोजी संपूर्ण भारतभर महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून श्री बैठक लासलगाव यांच्या माध्यमातून लासलगाव व पिंपळगाव नजिक ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता अभियान राबविले. या स्वछता मोहिमेमध्ये श्री बैठक लासलगाव मधील १०० श्री सदस्य (स्वयंसेवक), लासलगाव ग्रामपंचायतीचे २५ कर्मचारी आणि १० मान्यवरांनी सहभाग घेतला होता.

यावेळी लासलगाव येथील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजू, बस स्टॅन्ड ओहोळ भाग कॉलेज रोड, पिंपळगाव नजिक येथील स्मशान भूमी आणि परिसर या ठिकाणी स्वछता मोहीम राबविण्यात आली.

स्वच्छता मोहिमे दरम्यान सुमारे १०५० किलो ओला कचरा तर ९०५० किलो सुका कचरा असा एकुण १०१०० किलो कचरा संकलित करून लासलगाव ग्रामपंचायतीचे ४ तर पिंपळगाव नजिक ग्रामपंचायतीचे १ ट्रॅक्टर ने त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

सदर अभियानाचे उद्घाटन लासलगाव येथील सरपंच योगिता योगेश पाटील आणि पिंपळगांव नजिकचे सरपंच काशिनाथ माळी यांनी केले. यावेळी पिंपळगाव नजीक ग्रामपंचायतीचे सदस्य अ‍ॅड. सुभाष देशमुख, सिमाताई दरेकर, कृ.उ.बा. समितीचे संचालक प्रवीण कदम, पंचायत समिती निफाडचे माजी सदस्य उत्तम वाघ, प्रतिष्टीत नागरिक योगेश पाटील, गोपी गोर, पंकज सुर्वे, योगेश गलांडे, शांताबाई देशमुख, बाळासाहेब सोनवणे, सचिन नाईकवाडे, अकबर शेख, दिनकर कोल्हे, विजय क्षिरसागर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यापूर्वी विहिरी आणि नद्यांची स्वच्छता करणे, जल पुनर्भरण करणे, पाणपोई करणे, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण आणि संवर्धन सारखे समजपयोगी उपक्रम राबविले गेले आहेत. सदरचे सर्व उपक्रम हे अनुकरणीय आणि स्तुत्य उपक्रम आहेत. सर्व सेवक स्वयं स्फूर्तीने यामध्ये सहभाग नोंदवित असतात.

सौ.योगिता योगेश पाटील,
सरपंच
ग्रामपंचायत लासलगाव.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे