रोहिले बुद्रुक ग्रामसेवक तडवी यांनी केली बेकायदेशीर नोंद; दोघांना ग्रामपंचायतीतर्फे नोटीसा बजावल्या
नांदगाव-प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल):- नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नसेल तडवी यांनी त्यांच्या कारकिर्दी काळामध्ये कुठल्याही प्रकारचा नोंदणीकृत दस्त न घेता, सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी नसताना ग्रामपंचायती ठराव न घेता आदिवासी शेतजमीनीत घराची नोंद ग्रामपंचायतीच्या आठ नंबर वर नोंद केली असून सदरच्या उतारा तयार केला असल्याने. व या संदर्भात रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतला तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर रोहिले बुद्रुक ग्राम पंचायतने शेतजमीन मालक (आदिवासी) पोपट आसाराम पवार तर भोगवटदार दिग्विजय लक्ष्मण पाटील यांना दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी पत्र काढले असून त्यांचे लिखित स्वरूपात व कागदपत्राचे आधारे ग्रामपंचायत कळवावे असे पत्र देण्यात आले आहे. परंतु ग्रामसेवक नसीर तडवी यांना मात्र या ग्रामपंचायतीने पाठीशी घालून त्यांना पत्र अगर नोटीस काढलेली नाही. त्यामुळे रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत सावळा गोंधळ करते की काय अशी दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील पोपट आसाराम पवार (आदिवासी) यांची शेती गट नंबर 110 क खाते क्रमांक 220 क्षेत्र 18 आर ही शेतजमीन आदिवासी खातेदार यांची आहे. सदरची शेत जमीन सक्षम प्राधिकारी यांचे पूर्वपरवानगीशिवाय हस्तंतरास बंदी आहे असा शेरा असताना देखील श्री दिग्विजय लक्ष्मण पाटील यांना साठेखत करून दिलेले आहे. व त्यानुसार ग्रामपंचायत रेकॉर्ड नमुना नंबर आठ वर त्यांचे नाव भोगवटदार सदरी व मालक सदरी गट नंबर धारकाचे नाव ग्रामपंचायतच्या नमुना नंबर आठ वर नोंद केलेली आहे. मात्र कोणताही नोंदणीकृत दस्त रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीकडे दिलेले नाही. सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेतलेली नाही, ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्य च्या मासिक सभा व ग्रामसभा यामध्ये विषय घेऊन ठराव घेण्यात आलेला नाही. तत्कालीन ग्राम विकास अधिकारी श्री नशीर तडवी यांनी पदाचा गैरवापर करून रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतच्या नमुना नंबर आठ वर नाव नोंदणी केल्याचे आढळून आले असून तसा आठ चा उतारा देखील तयार करण्यात आलेला आहे. सदरची रद्द करण्यात येऊन आठ चा उतारा रद्द करण्यात यावा. असा तक्रार अर्ज योगेश प्रल्हाद पाटील यांनी दाखल केला होता. या अर्जाची रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतने दखल घेत शेत जमीन मालक पोपट आसाराम पवार राहणार रोहिले बुद्रुक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांना रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत दिलेल्या नोटिस मध्ये म्हटले आहे की, उपरोक्त विषयास अनुसरून सुचित करण्यात येते की, श्री योगेश प्रल्हाद पाटील यांचा तक्रारी अर्ज रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत तिकडे प्राप्त झालेला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की गट नंबर 110 क खाते क्रमांक 220 क्षेत्र 18 ही शेतकी मी आदिवासी खातेदार यांची आहे. सदरची शेतजमीन सक्षम प्राधिकरण यांचे पूर्व परमेश्वर हस्तंतरस बंदी आहे. असा शेरा सदर शेत जमिनीवर असताना देखील आपण श्री दिग्विजय लक्ष्मण पाटील यांना साठेखत करून दिलेले आहे. व त्यानुसार ग्रामपंचायत नमुना नंबर आठ वर त्यांची नाव भोगवटा सद्री व मालक सदरी लावणे करिता काही दस्त ग्रामपंचायतकडे सादर केला आहे. व त्यानुसार तत्कालीन ग्रामविकास अधिकारी श्री नशीर तडवी यांच्या हस्ते सदर ग्रामपंचायत नमुना नंबर आठवर नाव नोंदणी केल्याचे आढळून येते. मात्र असा कोणताही दस्त अश्रूत नाही तसेच सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी नाही ठराव नाही अधिकृत जास्त आशीर्वाद नसताना सदस्य जमिनीचा ग्रामपंचायत उतारा तयार करून संबंधित श्री दिग्विजय लेखन पाटील यांनी आपली गट नंबर 110 ची शेतजमीन 18000 बळकवली असल्याचे टकरीत नमूद आहे यासंबंधी आपण आपले काय म्हणणे आहे हे लिखित स्वरूपात व कागदपत्राचे आधारे ग्रामपंचायतला सात दिवसाच्या आत कळवावे. पोपट आसाराम पवार यांना दिलेल्या नोटीस (पत्रात) म्हटले आहे.
तर दिग्विजय लक्ष्मण पाटील राहणार रोहिले बुद्रुक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांना रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटीस पत्रामध्ये म्हटले आहे की उपरोक्त विषयास अनुसरून सुचित करण्यात येते की श्री योगेश प्रल्हाद पाटील यांनी सदर विषय बाबतचा तक्रार अर्ज ग्रामपंचायतकडे केलेला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की गट नंबर 110 क खाते क्रमांक 220 क्षेत्र 18000 ही शेतजमीन आदिवासी खातेदार यांची आहे. सदरची शेतजमीन सक्षम प्राधिकारी यांचे पूर्वपरवानगीशिवा हस्तंतरास बंदी आहे असे असताना देखील ग्रामपंचायतीने श्री दिग्विजय लक्ष्मण पाटील यांचे नावे साठे कथा वरून करून दिलेले आहे. व त्यानुसार ग्रामपंचायत नमुना नंबर आठवर आपले नाव भोगू वाटोळा सदरी व मालक शेतकरी गट नंबर धारकाचे नाव लावलेले आहे. व हे सर्व रेकॉर्ड तत्कालीन ग्रामविकास अधिकारी नशीर तडवी यांच्या हस्ते केलेला असून ग्रामपंचायत नमुना नंबर आठवर नाव नोंदणी केल्याचे आढळून येते. मात्र असा कोणताही दस्त आश्वास नाही तसेच सक्षम अधिकारी परवानगी नाही ठराव नाही अधिकृत दस्त अश्वत नसताना सदरचे जमिनीचा ग्रामपंचायतचा उतारा तयार करून संबंधित श्री पोपट आश्रम पवार यांची गट नंबर 110 ची शेती जमीन 18 आर आपण बळकवली असल्याची तकरीत नमूद आहे. यासंबंधी आपण आपले काय म्हणणे आहे हे लिखित स्वरूपात व कागदपत्राची आधारे ग्रामपंचायतला सात दिवसाच्या कळवावे. असे म्हटले आहे.
परंतु तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना मात्र कोणत्याही प्रकारची कारणे दाखवा नोटीस व पत्र रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत ने का दिले नाही. याबाबत उलट सुलट गावात चर्चा सुरू आहे.
ग्रामपंचायतीला उत्पन्न वाढीसाठी सदरचे शेतजमिनीतील घराची नोंद ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर आठ रजिस्टर मध्ये करण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. परंतु सदरच्या शेत जमिनीवर आदिवासी जमीन असल्याने सक्षम प्राधिकारी यांचे पूर्ण विश्वास तर बंदी आहे असा शहर असताना देखील व नोंदणीकृत दस्त ग्रामपंचायतीकडे दिलेल्या नसतानाही रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत ने ग्रामपंचायतच्या नमुना नंबर 8 च्या रजिस्टर मध्ये नोंद कोणत्या नियमानुसार करू शकते. व आज रोजी सदरच्या शेत जमिनीच्या सातबारावर पीक पाहणी पूर्ण क्षेत्रावर दाखवली जाते. हे कितपत योग्य आहे हेही पाहणे गरजेचे आहे. एकीकडे शेतजमीन वहिवाट आहे. एकीकडे ग्रामपंचायतीकडे घर बांधण्याची नोंदणी केलेली आहे. गट नंबर 110 क खाते क्रमांक 220 क्षेत्र 18 आर च्या घराची नोंद ग्रामपंचायतला आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे उत्पन्न घेतले जात नाही. क्षेत्रावर पिक पेरा ची नोंद होते. हे कितपत योग्य आहे. तरी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत तिने निपक्ष पातीपने शेत जमीन मालक, भोगवटदार, आणि तत्कालीन ग्राम विकास अधिकारी तडवी यांचा देखील लेखी अहवाल घेऊन ग्रामपंचायतचे संपूर्ण रेकॉर्ड तपासून योग्य ती कार्यवाही करावी. किंवा सदरचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करावा आणि त्याप्रमाणे कारवाई करावी अशी देखील मागणी आता रोहिले बुद्रुक गावातून जोर धरू लागली आहे.


