पालकांच्या हाती दत्तक बालक देण्याची प्रथमच संधी
• पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे मनोगत
नाशिक ( किरण घायदार ): निराधार निरागस बालकांचे जीवन अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य ७० वर्षे केले जाते. आधाराश्रम ही संस्था अखंडपणे हे सेवाकार्य करीत आहे. मानवतेच्या मंदिरातील ही व्यवस्था तात्पुरती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. मुलांना हक्काचे दत्तक पालक मिळावे यासाठी संस्थाचालक नेहमीच आग्रही असतात. त्यानुसार येथील बालक दत्तक पालकांच्या सुरक्षित हाती सोपवण्याची संधी मला प्रथमच मिळाली. असे भावपूर्ण मनोगत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नोंदवले.
येथील आधाराश्रम संस्थेतील एक अनाथ बालक केरळ येथील पालकांनी दत्तक घेतले. या भावनीक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक उपस्थित होते. या हृद्य कार्यक्रमात सर्वजण सद्गदित झाले. आयुक्त व पालकांचे नेत्र आनंदाश्रूंनी पाणावले. उपाध्यक्ष सुनिता परांजपे यांनी स्वागत केले. विश्वस्त विजय दातार यांच्या हस्ते आयुक्तांचा सत्कार करण्यात आला. कार्यवाह हेमंत पाठक यांनी आधाराश्रम व दत्तक प्रक्रियेविषयी उपस्थितांना माहिती दिली. केरळमधील दांपत्याला आधाराश्रमातील बालक दत्तक देण्यात आले. सदस्य मिलिंद कचोळे, नितीन वैद्य, समन्वयक राहुल जाधव, सुवर्णा जोशी, मराठी व मल्याळम भाषा दुभाषी विभा पाटील आदी उपस्थित होते.