Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र (नाना) पगार यांचे निधन

0 4 2 9 5 7

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र (नाना) पांडुरंग पगार (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दु. ३ वाजता उत्राने, ता.बागलाण जि. नाशिक येथे होणार आहे.

सन २०१२ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार, मंत्री छगनरावजी भुजबळ यांचे निकटवर्तीय असलेल्या ॲड. रविंद्रनाना पगार यांनी नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणून काम केले होते.

संघटनात्मक कामकाजाचा सुमारे ४० वर्षांचा अनुभव असलेल्या ॲड. रविॅद्र पगार यांनी एकत्र काँग्रेसमध्ये युवक काँग्रेस व NSUI या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्षपद देखील यशस्वी रित्या सांभाळले होते.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच विविध जिल्ह्यांना निरीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केले होते.

सन १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर राज्यात सर्वप्रथम ॲड.रवींद्रनाना पगार यांनी नाशिक येथील मामा मुंगी मंगल कार्यालयात शरद पवारांच्या समर्थनाथ मेळावा घेतला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व. अजित पवार व ना.छगन भुजबळ यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ॲड. रविंद्रनाना पगार या दोन्ही नेत्यांच्या पाठीशी संपूर्ण संघटना एकसंघ ठेवली होती.

त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून शोक व्यक्त केला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे