शेतकरी आणि नागरिकांनी सर्पदंश टाळण्यासाठी सतर्कता बाळगा : चैतन्य अहिरे
शेतकरी आणि नागरिकांनी सर्पदंश टाळण्यासाठी सतर्कता बाळगा : चैतन्य अहिरे
बेलगाव कुऱ्हे : पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशाने अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागतो. विषबाधेच्या घटना देखील सतत घडत असतात. पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत काळजी व खबरदारी घेऊन शेतकरी आणि नागरिकांनी सर्पदंश टाळण्यासाठी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे आवाहन भारत राष्ट्र समिती इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते चैतन्य अहिरे यांनी केले. सध्या सर्पदंश व विषबाधेच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून काही रुग्ण नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या महिण्याभरापासुन सर्पदंश झालेल्या रुग्नांच्या प्रमाणात संख्येत वाढ होत असुन दुर्दैवाने काही रूग्नांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या असून शेतकऱ्यांनी शेतीत काम करताना सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे चैतन्य अहिरे यांनी सांगितले. तालुक्यात एप्रिलपासून 26 सर्पदंशाच्या घटना घडल्या असून, सर्पदंशावर 240 डोस आहे. सर्पदंश झाल्यास गावठी उपचार व अंधश्रद्धेला बळी न पडता प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून उपचार घेणे गरजेचे असल्याचे इगतपुरीचे तालुका वैदयकीय अधिकारी एम बी देशमुख यांनी सांगितले.