दिगंबर घाडगेपाटील यांचे कार्य प्रेरणादायी – बाळासाहेब सोनवणे
- महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील यांचा सत्कार संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सर समवेत सेवानिवृत्त प्राचार्य पोपटराव आव्हाड.
नाशिक:प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी महासंघ/ संघटनेच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय निमशासकीय कार्यालय,महामंडळे,स्थानिक स्वराज्य संस्था इ.सर्व क्षेत्रांमध्ये अपंग व्यक्ती हक्क अधिनियम १९९५,२०१६ कायदा,अन्वये शासन परिपत्रके नुसार दिव्यांगांचे पुनर्वसनाचे कार्य दिगंबर घाडगे पाटील अहोरात्र करत असून ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन त्यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी महासंघ/संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष, कुशल संघटक, दिव्यांग भूषण,आमचे मार्गदर्शक, सर्वांचे लाडके, दिव्यांग हीच आमची जात व मानवता हाच धर्म मानणारे आदर्श व्यक्तिमत्व, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्ली दरबारी दिव्यांगांचे प्रश्न रेटून धरणारे, दिव्यांगांचे तारणहार,दिव्यांग ह्रदयसम्राट,दिव्यांगांचे प्रश्नांची जाण असणारे सर्वसामान्य दिव्यांगांचे नेते आधारस्तंभ आदरणीय दिगंबर भगवान घाडगे पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सर समवेत व्ही एन नाईक शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त प्राचार्य पोपटराव आव्हाड, मनोज ताजणे आदी उपस्थित होते.