Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक

लासलगाव येथे भरवस्तीत लाखोंचा ऐवज चोरी

0 3 2 1 2 3

लासलगाव येथे भरवस्तीत लाखोंचा ऐवज चोरी

लासलगाव येथील सोसयटीतील बंद फ्लॅट मधून अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 82 हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लासलगाव येथील कोटमगाव रोडवरील श्री स्वामी समर्थ नगरातील धनवर्धिनी सोसायटी मधील फ्लॅट धारक कामानिमित्त बाहेर गावी गेले असतांना दोन फ्लॅट मध्ये चोरीची घटना घडली. रावसाहेब गोविंदराव पाटील व अभिषेक सोमनाथ गांगुर्डे हे कामानिमित्त बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने सुमारे 3 लाख 82 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या घटनेची माहिती मिळताच निफाड पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी डॉ. निलेश पालवे, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे