Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक

हॉटेलात जेवण्यास गेल्यानंतर ट्रॅक्टर व ट्रॉलीच लंपास

0 3 2 1 2 3

विंचुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीस आलेला मेंढी ता.सिन्नर येथील शेतकरी हॉटेलात जेवण्यास गेल्यानंतर हॉटेल समोरून ट्रॅक्टर व ट्रॉलीच लंपास करण्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत बाळु नाना गिते, वय ५९ वर्ष,रा.मेंढी ता.सिन्नर यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी हे साक्षीदार राजीव नामदेव गिते यांच्यासोबत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कांदे भरुन ते विंचुर कांदा मार्केट येथे कांदा विक्रीस आले होते. कांदा विक्रीनंतर ट्रॉली खाली करुन पावती घेवुन त्यांस भुक लागल्याने ते सुमारे १ लाख रु किमतीचा स्वराज्य ७४४ कंपनीचा नंबर क्रं एम. एच १५ बी.डब्लु ७५३८ निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व ५० हजार रु.किंमत असलेली ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली नं एम.एच १५ सी.एस १२३१ निळ्या रंगाची ट्रॉली, तिचे मागच्या बाजूस प्रथमेश नाव कोरलेले असे ट्रॅक्टर व ट्रॉली विंचुर निफाड रोडवर हॉटेल आनंद पॅलेसच्या समोर उभा करुन हॉटेल आनंद पॅलेस येथे जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी सायं ६.३० ते ७.४५ वाजेच्या दरम्यान सदर ट्रॅक्टर चालु करुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने साक्षीदार यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला आहे. त्यांचे फिर्यादी वरून लासलगाव पोलिस ठाण्यात गु.र.नं ९०/२०२५ भा.न्या सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो हवा बाळासाहेब कांदळकर अधिक तपास करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे