Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

शाळेच्या बसला आग; सुदैवाने जीवित हानी नाही

0 3 2 1 2 3

नांदगाव -रणखेडा येथे शाळेच्या बसला अचानक आग लागली मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. या प्रसंगी सरपंच शांताराम शिंदे, बापू सुरसे, निलेश शिंदे, हिरामण जाधव, सुनील मोरे, अर्जून फोडसे, रोशन वाघ, लहू शिंदे अशा सर्व ग्रामस्थांकडून तातडीची मदत झाली. बॅटरीचा स्फोट झाल्याने सदर घटना घडली असून आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या बादल्या आणून आग विझवली.

     दरम्यान नांदगाव आगराच्या बस कुठेही कधी बंद पडतात, आज अचानक आग लागणारी बस अशा अनेक घटना वारंवार पुढे येत असल्याने चांगल्या स्थितीतील बस नांदगाव आगारासाठी शासनाने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे