Breaking
कृषीवार्ता

*हमीभावापेक्षा कमी दर देणाऱ्या व्यापाऱ्यांवर गून्हे दाखल करा* 

शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन

0 1 5 1 2 0

*हमीभावापेक्षा कमी दर देणाऱ्या व्यापाऱ्यांवर गून्हे दाखल करा* 

(नेवासा प्रतिनिधी) :- सगळीकडे शेतकऱ्यांची सध्या सोयाबीन काढणीची लगभग सुरू असून मार्केटमध्ये सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत मार्केट मध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे.परंतु अनेक कष्ट करून घाम गाळून आणलेल्या शेतमालास मात्र त्या घामाचे दाम मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अगोदरच केंद्र सरकारने सोयाबीनला चार हजार नऊशे रूपये किमान दर घोषीत केला आहे. हा दर अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांत प्रचंड आक्रोश आहे. उत्पादन खर्चाचा विचार केल्यास सोयाबीनला साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषित करणे आवश्यक होते. त्यातही आज व्यापारी मार्केटमध्ये सोयाबीनची खरेदी सरकारने घोषीत केलेल्या दरानुसार न करता सोयाबीन मधील आद्रतेचे कारण देत अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल दरानेच खरेदी करत आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यास वेठीस धरूनच खरेदी केली जात आहे असे स्पष्ट दिसत आहे. पिडीत शेतकऱ्यांची दखल घेत संभाजी माळवदे, संतोष काळे, त्रिंबक भदगले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज तहसीलदार यांची भेट घेत ,व्यापाऱ्यांनी सोयाबीनची खरेदी ही शासनाने निर्धारित केलेल्या किमान दरानुसारच करावी त्यापेक्षा कमी दरात खरेदी करुण शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दिले. यावेळी तहसीलदार यांनी यावर तातडीने अंमलबजावणी करुन सदर व्यापाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. यावेळी रावसाहेब घुमरे, अंजुम पटेल, शेषराव गव्हाणे, दत्तात्रय निकम, दिलीप सरोदे, जालिंदर निपुंगे, गणपत मोरे, विकास चव्हाण, पप्पु पवार, आदीसह शेतकरी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे