Breaking
ब्रेकिंग

शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

0 5 1 7 3 0

निफाड तालुक्यात दुर्दैवी घटना ; शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

किरण कुमार आवारे…

शिरवाडे वाकद:- घराचे बांधकाम सुरू असताना खेळत असलेले दोन अल्पवयीन मजुरांची मुले घरामागील शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज बुधवार, दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेचा सुमारास निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द परिसरात घडली.

      याबाबत करण तानाजी वावधाने यांनी दिलेल्या खबरीनुसार, मानोरी खुर्द येथील नवनाथ सोपान वावधाने यांच्या मालकीच्या शेतातील गट क्रमांक १४८/२ मध्ये नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामासाठी मध्य प्रदेशातील मजूर काम करीत आहेत. बुधवारी दुपारी बांधकामाचे काम सुरू असताना मजुरांची मुले परिसरात खेळत होती. खेळता खेळता अरविंद दिनेश गोरे, वय ११, रा.ठोकबेडा, पोस्ट.घुसगाव, ता.राजपूर, जि. बडवणी, मध्य प्रदेश आणि सनी अजय रावत, वय १०, रा.चमुकनाज, ता.गुनावर, जि.पन्ना, मध्यप्रदेश हे दोघे घराच्या पाठीमागील शेततळ्यात जाऊन पडले. पाण्यात बुडाल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले. कुटुंबीय व घरमालकाच्या ही घटना लक्षात येताच त्यांना तातडीने शेततळ्यातून बाहेर काढून उपचारासाठी लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळकृष्ण अहिरे यांनी तपासणी केल्यानंतर दोन्ही मुलांना मृत घोषित केले.

      घटनेची माहिती मिळताच लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, पो.हवा. संदीप शिंदे तसेच औदुंबर मुरडनर, अरुण डोंगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पो.हवा संदीप शिंदे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे