0
4
2
9
5
7
महाराष्ट्रभर निवडणुकीचे वारे होऊ लागले असून लासलगाव गटाच्या निवडणुकीसाठी अनेक मातब्बर रिंगणात होते परंतु लासलगाव गटाकडे अवघ्या नाशिक जिल्ह्याची लक्ष लागून असलेले असताना लासलगाव गट आरक्षित निघाल्याने मातबरांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. लासलगाव गट वीस वर्षानंतर पुन्हा एकदा आरक्षित झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत या निवडणुकीत लासलगाव गटातून वनसगाव चे भूमिपुत्र तसेच माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर प्रल्हाद निकाळे यांनी आपली धर्मपत्नी सौ आरती निकाळे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले सुरू केले असून सर्वप्रथम वनसगाववासियांची मत जाणण्यासाठी व त्यांच्याशी विचार विनिमय करून त्यांच्या निर्णयावर उमेदवारी लढविण्याचा चंग बांधला आहे या निमित्ताने वनसगाव येथे सहविचार सभा घेण्यात आली या सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी हरे कृष्ण बाबांचे अनुयायी मुरलीधर बहीरुनाथ शिंदे होते.
यावेळी सर्वप्रथम सागर निकाळे यांनी आपल्या मनोगतातून मी आपल्याकडे संवाद साधण्यासाठी आलो असून तुम्ही जो निर्णय द्याल तो मला मान्य आहे यावेळी त्यांनी सर्वांना तुम्ही सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला तर मी निवडणुकीसाठी सौ आरती निकाळे यांची उमेदवारी करेल असे मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील मापारी, लासलगाव खरेदी विक्री संघाचे संचालक प्रकाश कापडी ,माजी सरपंच उत्तमराव शिंदे सेवानिवृत्त प्राचार्य पी वाय कडाळे सर, तंटामुक्तीचे अध्यक्ष एकनाथ दादा शिंदे, सेवानिवृत्त पर्यवेक्षक दौलत शिंदे सर ,गणेश बँकेचे उपाध्यक्ष उन्मेष डुंबरे, वनसगाव विकास संस्थेचे मा चेअरमन मधुकर आप्पा शिंदे, विद्यमान चेअरमन धनंजय डुंबरे, रामदास जावळे आदींनी मनोगत व्यक्त केले . यावेळी प्रत्येकाने आपापल्या मनोगतातून आलेल्या सुवर्णसंधीचा फायदा करून घेण्यासाठी सौ आरती निकाळे यांनी उमेदवारी करावी तसेच गावातील गट तट विसरून सर्वांनी एकत्रित येऊन काम करू असे आश्वासन दिले. ज्यावेळी प्रत्येकाने आपल्या मनोगत आतून सकारात्मक विचार मांडून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या व पाठिंबा दिला आहे. एकंदरीत सर्व बाबीचा विचार करता वनसगाव व परिसरातील मतदारांनी सौ आरती निकाळे यांच्या निवडून आणण्याच्या तयारीला आम्ही पक्ष कुठलाही असो सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासित केले.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सौ आरती निकाळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून सर्वांनी यावेळी एकमुखी पाठिंबा दिला आहे.
वनसगांव व पंचक्रोशी ग्रामस्थांकङुन जो प्रतिसाद मिळाला तो निश्चितपणे अविस्मरणीय राहील सर्वांच्या भाननेचा आदर ठेवुन निवङणुकीला सामोरे जाणार आहे सर्वांगीण विकासाला प्रथम प्राधान्य देणार असुन मतदारांच्या विश्वाला तङा जाऊ देणार नहि आपण दिलेली जबाबदारी निश्चितच यशस्वीपणे पार पाङेल …सौ.आरती सागर निकाळे (वनसगांव)
इच्छुक उमेदवार,लासलगाव गट
0
4
2
9
5
7




