गुन्हेगारीसामाजिक
मुलीस पैसे का दाखवतो ? याची विचारणा केल्याने विळा, कोयत्याने मारहाण

0
3
2
0
5
3
शरद लोहकरे, लासलगाव
‘मुलीस पैसे का दाखवतो’ याची विचारणा केली म्हणून मुलीच्या आईस व मामास विळ्या कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार निफाड तालुक्यातील खडकमाळेगांव येथे घडला.
याबाबत काजल मधुकर शिंदे यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१० एप्रिल रोजी सायं ६ वाजता माझा भाऊ गोरख मधुकर शिंदे ह.मु. माळेवाडा जि.अहिल्यानगर हा मला भेटण्यासाठी आला होता. मी खरकटे पाणी घराचे समोर फेकत असतांना शेजारी राहणारा नातेवाईक गौरव संजय गुंजाळ हा मला व माझ्या मुलीला पैसे दाखवत होता. तेव्हा मी त्यास म्हणाले कि, ‘तु पैसे का दाखवतो आहे?’ या बोलण्याचा राग येवुन त्याने मला शिवीगाळ करणेस सुरुवात केली. माझ्या भावाने पण पैसे का दाखवतो, शिवीगाळ का करतो? अशी विचारणा केल्याचा राग येऊन
त्याने त्याचे वडील संजय बाबुराव गुंजाळ, चुलत भाऊ शुभम दिलीप गुंजाळ, चुलता दिलीप बाबुराव गुंजाळ यांना बोलावुन घेवुन मला व भाऊ गोरख यांस मारहाण करत असताना शुभम दिलीप गुंजाळ याने बाजुला पडलेला लोखंडी विळा हातात उचलुन भाऊ गोरख याचे डोक्यात, डाव्या डोळयावर मारुन दुखापत केली तसेच गौरव संजय गुंजाळ याने त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने पुन्हा भाऊ गोरख याचे डोक्यात मारुन दुखापत केली. दिलीप गुंजाळ व शुभम गुंजाळ यांनी आम्हाला मारहाण, शिवीगाळ करुन, ‘तुम्ही आता वाचले, आमचे विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली व पुन्हा आमचे नादी लागले तर तुमचा मुडदाच पाडुन टाकु’ अशी धमकी दिली. आमचा ओरडण्याचा आवाज ऐकुन आमचे शेजारी सागर प्रभाकर शिंदे, अलका प्रभाकर शिंदे, प्रभाकर मारुती शिंदे यांनी धावत येऊन आमची सोडवणूक केली. भाऊ गोरख याच्या डोक्यातून रक्त येत असल्याने त्यास त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारार्थ दवाखान्यात हलवले. म्हणून माझी गौरव गुंजाळ, संजय गुंजाळ, शुभम गुंजाळ, दिलिप गुंजाळ यांचे विरोधात फिर्याद आहे. त्यांचे फिर्यादीवरून सदर आरोपींच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.संदीप निचळ अधिक तपास करीत आहेत.
0
3
2
0
5
3