मेडिकव्हर्ड फॅमिली हेल्थ कार्ड: एक कार्ड, फायदे अनेक
नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असलेले मेडिकव्हर हॉस्पिटल्स समूहाने आज नाशिकमध्ये “मेडिकव्हर्ड फॅमिली हेल्थ कार्ड” चे अनावरण नाशिक महानगरपालिकाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ तानाजी चव्हाण यांच्या हस्ते आणि मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख यांच्यासमवेत करण्यात आला. दर्जेदार आरोग्यसेवा सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या सर्व 23 युनिट्समध्ये उपलब्ध आहे, ज्याद्वारे मेडिकव्हर हॉस्पिटल्स समूहाची आरोग्यसेवा सुलभ, वैयक्तिकृत, आणि मूल्याधारित असल्याने सहज उपलब्ध होते.
या प्रसंगी बोलताना डॉ तानाजी चव्हाण म्हणाले , आरोग्यसेवा हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे, आणि “मेडिकव्हर्ड फॅमिली हेल्थ कार्ड” हे परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्यसेवेतील अंतर कमी करण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल आहे. या कार्डामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याला प्राधान्य देता येईल.
प्रमुख पाहुण्याच्या विचारांना पुष्टी देत मेडिकल डायरेक्टर डॉ. सुशील पारख म्हणाले, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये आम्ही आमच्या रुग्णांना आरोग्यसेवेसाठी कायम वचनबद्ध आहोत. मेडिकोव्हर्ड फॅमिली हेल्थ कार्ड हे केवळ एक कार्ड नसून या उपक्रमाद्वारे आम्ही प्रगत आणि परवडणारी आरोग्यसेवा प्रत्येकाच्या दारात पोहोचवण्याचे काम करत आहोत.
या कार्यक्रमाच्या विशेष प्रसंगी डॉ तानाजी चव्हाण यांनी हॉस्पिटल मधील बाल हृदय रोग विभागाला भेट दिली डॉक्टर , रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.
मेडिकव्हर्ड फॅमिली हेल्थ कार्ड चे मुख्य फायदे. हे कार्ड आरोग्यसेवेसाठी विशेष सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आले आहे, जसे की: ओपीडी कन्सल्टेशनवर 30% सवलत. ओपीडी तपासण्यांवर 15% सवलत. इन-पेशंट आणि डे-केअर सेवांवर (फार्मसी व कंझ्युमेबल्स वगळून) कॅश ऍडमिशन्ससाठी 10% सवलत. विमा व कॉर्पोरेट ऍडमिशन्ससाठी नॉन-मेडिकल सेवांवर 50% सवलत. 10 कि.मी.च्या परिसरात मोफत रुग्णवाहिका सेवा. होम केअर सेवांवर (फार्मसी वगळून) 30% सवलत. ₹5000 पेक्षा जास्त फार्मसी बिलांवर 20% सवलत. हेल्थ चेकअप पॅकेजवर 10% सवलत.
याशिवाय, हे कार्ड कुटुंबातील चार सदस्यांना आरोग्य सेवा देते. त्याचप्रमाणे फॅमिली रिवॉर्ड्स प्रोग्राम अंतर्गत मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये ₹1000 खर्च केल्यावर 1 पॉइंट मिळतो, ज्याला ₹1 म्हणून पुढील आरोग्यसेवेसाठी रिडीम करता येते.
सोपी आणि तात्काळ नोंदणीची प्रक्रिया : कुटुंब आपले नाव, वय, पत्ता, फोन नंबर, आणि रक्तगटाची माहिती देऊन नोंदणी करू शकतात. डिजिटल कार्ड अनोख्या QR कोडसह तत्काळ “व्हॉट्सॲपवर” दिले जाते, तर भौतिक कार्डांसोबत फायदे दर्शवणारे स्वागत पत्रासह पोस्टाने आपण दिलेल्या पत्यावर पाठवले जाते.
या कार्यक्रमाला मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ तानाजी चव्हाण , मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख , केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी, तज्ञ डॉक्टर, विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांची उपस्थति होती.