Breaking
ब्रेकिंग

कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर केंद्राकडुन सकारात्मक तोडगा – ज्ञानेश्वर जगताप

ना. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नास यश

0 4 7 8 6 6

कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर केंद्राकडुन सकारात्मक तोडगा – ज्ञानेश्वर जगताप

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नास यश

लासलगांव, दि. 29 ( ऋषिकेश जोशी) :-

गेल्या 03 ते 04 महिन्यांपासुन कांदा बाजारभावात होणारी घसरण विचारात घेऊन केंद्र व राज्य शासनाने कांदा प्रश्नी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी लासलगांव बाजार समितीच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या मंत्री महोदयांना करण्यात आली होती.

त्याअनुषंगाने येवला-लासलगांव मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी पुढाकार घेत नुकतीच केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री ना. अमित शहा व केंद्रीय कृषिमंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांची राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व ना. सुनेत्रा पवार यांचेसह मंत्रीमंडळातील प्रमुख सहकारी मंत्र्यांसह भेट घेऊन महाराष्ट्रातील कांद्याचा प्रश्न अतिशय सविस्तरपणे केंद्रीय नेतृत्वाकडे मांडला आहे. त्यामध्ये केंद्र शासनाकडुन करण्यात येणारी अचानक कांदा निर्यातबंदी, कांद्यावरील निर्यात शुल्क वाढविणे, किमान निर्यात मुल्यात वाढ करणे आणि नाफेड व एनसीसीएफकडुन केली जाणारी कांदा खरेदी इ. मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी कांदा दरात सातत्याने होणाऱ्या चढ-उतारामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असलेली अस्वस्थता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणुन देण्यात आली.

यावेळी महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व मागण्या अत्यंत गांभिर्याने ऐकुन घेत त्यावर केंद्रीय नेतृत्वाने नाफेड आणि एनसीसीएफने सुरू केलेली कांदा खरेदी आता बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता शेतकऱ्यांकडून केली जाईल. तसेच 0२ लाख टनांऐवजी १० लाख टन कांदा खरेदी करणेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल, देशांतर्गत कांद्याला बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून कांदा बियाण्यावर मोठ्या प्रमाणात एक्स्पोर्ट सरचार्ज लावण्यात येईल. तसेच नाफेड व एनसीसीएफचा सध्याचा कांदा खरेदी भाव आणखी कसा वाढवता येईल यावर देखील चर्चा झाली. त्याचप्रमाणे नाफेड व एनसीसीएफमध्ये प्रतवारीच्या नावाखाली माल नाकारला जाऊ नये म्हणून आता मानवी हस्तक्षेपाऐवजी यंत्रसामग्रीच्या माध्यमातून अचूक प्रतवारी केली जाईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती ना. छगन भुजबळ यांनी दिली असे बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दि. 25/05/2026 रोजी प्रसिध्द केलेल्या कार्यालयीन ज्ञापनान्वये नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदीसाठी दि. 26/05/2026 पासुन रू. 1,580/- प्रति क्विंटल किमान हमी खरेदी किंमत जाहीर केल्यानंतर आज लासलगांव बाजार समितीत कांद्याची किमान रू. 700/-, कमाल रू. 1,751/- व सर्वसाधारण रू. 1,350/- प्रति क्विंटल दराने विक्री झाल्याचे जगताप यांनी सांगितले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेऊन येत्या 10 दिवसांमध्ये केंद्र शासनाकडुन अजुन सकारात्मक निर्णय होणार असल्याने त्याचा लाभ राज्यातील विशेषत: नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याने तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या मंत्रीमहोदयांसह ना. छगन भुजबळ यांचे आभार मांडण्यात येत असल्याचे जगताप यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 8 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे