यात्रेहून परतणाऱ्या दोन तरुणांचा अपघाती मृत्यू
नगरसुल येथे अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
लक्ष्मण घुगे राजापूर….
चंपाषष्ठी निमित्त सायगाव येथील श्री खंडेराव महाराज यात्रेहून घरी परतत असताना पाटात दुचाकी पडल्याने दोन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नगरसुल येथील१) प्रसाद बळीराम पवार वय १९, २) तरुण सुशांत गणेश फरताळे वय १६ हे दोघे व एक तिसरा मित्र हे तिघेही सायगाव येथील खंडोराव महाराज यात्रेतून परतुनी आल्यावर तिसर्या मित्राला घरी सोडुन हे दोघे घरी परतत असताना कटके वाडी रस्त्यावरुन मोटर सायकलवर येत असताना कोळगाव रस्त्यालगत असणार्या पाटाच्या वळणाचा अंदाज न आल्याने ते दोघेही भरधाव वेगाने पाटात जावून पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्याचा नासिकला नेत असतांना मृत्यू झाला
ही घटना चंपाशष्टीच्या दिवशी रात्री सात ते साडेसातच्या सुमारास अपघात घडला असुन घटनेची माहीती नगरसुल ग्रामीण रुग्णालयात कळताच रुग्णालयाची रुग्नवाहीका चालक ईश्वर घोडेस्वार यांनी अपघातग्रस्तांना नगरसुल रुग्णालय दाखल करुन डॉक्टरांनी प्रथमोपचार केले. त्यानंतर तात्काळ नासिक येथे नेत असताना मृत्यू झाला.
चंपाषष्ठी सणाच्या दिवशी निधनाच्या घटनेमुळे नगरसुल परिसरात शोककळा पसरली आहे आहे