या वीकएंडला “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर
चॅम्पियन्स का टशन” मध्ये हनी सिंह सोबत डान्सचा आनंद घ्या!
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” या त्यांच्या आगळ्यावेगळ्या फॉरमॅटमध्ये या वीकएंडला ख्रिसमसच्या मोसमाची मस्ती असणार आहे. या वीकएंडला रात्री 7 वाजता विशेष अतिथी म्हणून यो यो हनी सिंहचे या शोमध्ये स्वागत करतील, रेमो डिसूझा, मलाइका अरोरा, गीता कपूर आणि होस्ट हर्ष लिंबाचिया. यावेळी आव्हाने पण अनोखी असतील. सांता कलॉज मंचावर एंट्री घेईल आणि त्याच्या पोतडीतून स्पर्धकांसाठी वेगवेगळी आव्हाने निघतील, ज्यातून त्यांच्या सर्जनशीलतेची, कौशल्याची आणि टीमवर्कची कसोटी होईल.
‘बेस्ट फुट फॉरवर्ड’ चॅलेंजमध्ये अरशिया आणि अनुराधा आपले कौशल्य दाखवतील; ‘अदला बदली’ चॅलेंजमध्ये परी + फ्लोरिना आणि विवेक + अकीना यांच्या टीममध्ये अंतर्गत अदलाबदली होऊन विरोधी डान्स शैलीत ते डान्स करताना दिसतील; ‘डान्स ऑफ’ या चॅलेंजमध्ये टीम SD मधून निवडलेल्या रुपसा आणि वर्तिका टीम IBD मधून निवडलेल्या शिवांशु आणि अनिकेतशी टक्कर घेतील. त्यांच्या डान्स दंगलीत इतर अतिरिक्त कोणतेही तत्व नसेल. ‘देसी प्रॉप’ चॅलेंज गंमतीदार असेल. त्यात गीता तेजस आणि आकाशला पाठवेल, तर मलाइका देबपर्णा, प्रतीक आणि सौम्याला पाठवेल. हे सगळे स्पर्धक प्रॉप वापरण्याचे कसब दाखवतील. धमाल ‘मेरी मर्जी 2.0’ मध्ये संचित आणि अनिकेत परीक्षकांनी दिलेल्या वेगवेगळ्या गाण्यांवर झटपट, सहज शैलीत बदल करून ठेका धरतील. अकीना आणि अरशिया यांच्यातील अंतिम लढत जबरदस्त असणार आहे, ती अवश्य बघा.
मजेदार प्रश्नोत्तरीत होस्ट हर्ष लिंबाचिया हनी सिंहला त्याच्या भपकेदार जीवनशैलीविषयी, भूतकाळातील प्रेम-संबंधांविषयी आणि गाजलेल्या गाण्यांविषयी प्रश्न विचारेल. एका पार्टीसाठी एका रात्रीत 40 लाख रु. खर्च केल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना हनी सिंहने सांगितले, “ती दुबईमधली जुनी गोष्ट आहे. जेव्हा नवी नवी प्रसिद्धी, नवे नवे पैसे मिळाले होते.. अशा वेळी मग चुका होतात. बिल आले, तोपर्यंत तो क्लब किती महागडा आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती. मुली आमच्या टेबलापाशी येत होत्या, आम्हाला वाटत होते की त्या आमच्यासाठी येत आहेत. नंतर हे समजले की त्यांचे बिल देखील त्या आमच्यावर थोपत होत्या.” हर्षने त्याला विचारले, “तो कभी ऐसा हुआ कि आपका दिल टूटा हो, या आपने कभी किसी का तोड़ा है?” यावर हनी सिंह म्हणाला, “मुझ से बहुत टूटे हैं, हर 3-4 मन्थ्स में टूटते रहते हैं.” आपल्या ब्राऊन रंग या गाजलेल्या गाण्याबद्दल हनी सिंहने हसत हसत सांगितले की, “या गाण्याची प्रेरणा दुसरी तिसरी कुणी नसून मलाइका होती!”
हनी सिंहने थट्टा करत रेमोला विचारले की, ही आव्हाने खरी होती का. त्यावर रेमोने आकाश, अनिकेत आणि तेजस या स्पर्धकांना बोलावले आणि हनी सिंहला गायला सांगून त्यावर परफॉर्म करायला सांगितले आणि हे सिद्ध करून दिले की, प्रत्येक अॅक्ट अगदी अस्सल होता.
या वीकएंडला बघत रहा, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन रात्री 7 वाजता आणि अनुभवा आणखी काही अविस्मरणीय क्षण दोन टीम्सच्या दंगलीत, “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” मध्ये!