0
1
5
1
2
1
शरद लोहकरे, लासलगाव…
वाहेगांव ता. निफाड येथील २० वर्षीय युवकाचे गोई नदीत शव आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
वाहेगाव ता.निफाड येथील रोहीत लहानु पवार वय २० हा दि.३ नोव्हें सकाळी ८ वाजता कॉलेजला जातो असे सांगून घराबाहेर गेला होता, त्यानंतर त्याचा कोणाशीही संपर्क झाला नाही. याबाबत पो.पा.सचिन आहेर यांनी खबर दिलेनंतर पो.नाईक किशोर लासुरकर व सहकारी यांनी त्याचा कसून शोध घेतला. त्याचा शोध घेत असतांना त्याचे दप्तर गोई नदीच्या काठावर मिळाल्याने त्याचा नदीच्या पाण्यात शोध घेतला.
आज दि.४ डिसें रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचे प्रेत गोई नदीच्या पाण्यात मिळुन आल्याने लासलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून स.पो.नि.बी.जे.शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.वसंत हेंबाडे अधिक तपास करीत आहेत.
0
1
5
1
2
1