दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध :खा.शोभा बच्छाव
राष्ट्रवादी जिल्हा दिव्यांग सेलकडून सत्कार समारंभ
नाशिक: प्रतिनिधी
धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या नवनियुक्त खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना खासदार डॉ. शोभाताई बच्छाव म्हणाल्या की धुळे लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करणार असून मतदारसंघातील प्रलंबित असलेले सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहेत.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब दादा सोनवणे सर यांनी दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याबरोबरच दिव्यांगाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्रात विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी खासदार शोभा बच्छाव यांच्याकडे केली.यावेळी दिव्यांग सेलचे मारुती राठोड,रवी पाटील, सुनील वाघ,आकाश पिंगळे,सुनील पगार, सुधाकर बेंडकुळी, सुरेखा बागुल, स्वाती कुलकर्णी,उषा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.