Breaking
सामाजिक

बॉर्नीओ माता आणि बाल हॉस्पिटल नाशिक येथे जागतिक फादर्स डे साजरा

0 3 2 1 2 3

बॉर्नीओ माता आणि बाल हॉस्पिटल नाशिक येथे जागतिक फादर्स डे (Father’s Day) साजरा करण्यात आला

निमाई इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रा. लि. संचलित बॉर्निओ माता आणि बाल हॉस्पिटल नाशिक येथे “जागतिक फादर्स डे” १६ जून २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

मातृत्व आणि पितृत्व हे दोन्ही प्रेम आणि त्यागाचे प्रतीक आहेत. ज्या प्रकारे आई आपल्या मुलांचे संगोपन करते, त्याचप्रमाणे वडील त्यांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतात. आईचे प्रेम हृदयाला उबदार ठेवते तर वडीलांच्या मार्गदर्शनामुळे जीवनाला दिशा मिळते. आई-वडील हे दोन्ही आपल्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांचे योगदान अमूल्य आहे.म्हणून फादर्स डे च्यानिम्मिताने वडिलांच्या या योगदानाला बॉर्निओ माता आणि बाल हॉस्पिटल नाशिक यांनी हॉस्पिटलमध्ये हा दिवस साजरा केला.

आतापर्यंत हॉस्पिटल मध्ये १५०+हून अधिक delivery सुखरूप व यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत.म्हणूनच बॉर्निओ हॉस्पिटल मध्ये आई व बाबा झालेल्या पेशंटला विशेष पाहुणे म्हणूनआमंत्रित केले गेले होते. या खास दिवशी हॉस्पिटलमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले, ज्यामध्ये वडील आणि मुलांमध्ये विशेष स्नेह आणि आत्मीयतेचे बंध दृढ करण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमात प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.यास्मिन बेग यांनी गर्भधारणेपूर्वीच्या समुपदेशनापासून बाळ जन्माला आल्यानंतर ते १५ वर्षाचे होईपर्यंत येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठीचे नाशिकमधील बॉर्निओ हॉस्पिटल वन स्टॉप डेस्टीनेशन कसे आहे हे सर्वाना समजवून सांगितले. नाशिकमध्ये सुरू असलेल्या माता अतिदक्षता (Maternal ICU) विभागाची व हाय रिस्क प्रेगनन्सीला ट्रीट करण्यासाठी उपलब्ध असेलेल्यासुविधा व त्याच क्षमतेचे स्त्रीरोग तज्ञ आणि Obstetrics Physician याबद्दल मीहिती दिली तसेच या पेशंटला उपचार करण्यासाठी लागणारे सर्व क्रिटीकल उपकरणे बॉर्निओ मध्ये उपलब्ध आहेत याचीहि सर्वाना माहिती दिली.

प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. रूपाली पवार यांनी पेशंटची प्रसूती झाल्यानंतर बाळाचे वजन कमी असल्यास किंवा इतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यास बॉर्निओ मध्ये आधुनिक आणि नवीन उपकरणांनी सज्ज असा नवजात अतिदक्षता (NICU) विभागाबद्दल माहिती दिली. तसेच ६ ते १ वर्षापर्यंत च्या बाळाचे आहार नियोजन या बदल खूप सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “वडील हे कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यांचे आरोग्य चांगले राखणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.”

बाल दंतरोग तज्ञ डॉ. पूजा भूतडा यांनी लहान ते मोट्ठ्यान पर्यंत दातांची काळजी कशी घ्यावी हे सविस्तर सांगितले.  

हॉस्पिटल तर्फे सर्व वडीलानसाठी विविध स्पर्धा आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांनी उपस्थित सर्वांचे मन मोहरले. तसेच, काही वडीलांनी आपल्या अनुभवांचे कथन केले.

कार्यक्रमाला स्त्रीरोग तज्ञ डॉ कमलेश लहानगे, डॉ.गीतांजली बोरसे, डॉ.यास्मिन बेग व डॉ. वैशाली अग्रवाल तसेच बालरोग तज्ञ डॉ. रूपाली पवार, डॉ. चेतन शिनकर, डॉ.अमित राउत, कन्सल्टंट obstetric medicine डॉ. मकरंद राणे, बाल दंतरोग तज्ञ डॉ. पूजा भूतडा, फिटल मेडिसीन तज्ञ डॉ. उझमा, आयुर्वेदाचार्य डॉ. वैदेही देवधर तसेच हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी, सर्व वडीलांना खास भेटवस्तू देण्यात आल्या आणि त्यांच्या समर्पणासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे