Breaking
शासकीय

परवानाधारक मृत मुद्रांक विक्रेता परवान्याचे वारसांना होणार हस्तांतरण

0 1 5 1 2 2

नाशिक (जि. मा. का. वृत्तसेवा) : जिल्ह्यातील परवानाधारक मृत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाना हस्तांतरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली असून, संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

कोरोना महामारीमध्ये मृत्यू पावलेले परवानाधारक मुद्रांक विक्रेते तसेच जे मुद्रांक विक्रेते 24 सप्टेंबर 2010 किंवा त्यानंतर नैसर्गिक व अन्य कारणास्तव मृत्यू पावले आहेत, अशा मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना उपजीविकेचे साधन मिळावे यादृष्टीने विशेष बाब म्हणून सदर मुद्रांक परवाना वारसांना हस्तांतरीत करण्यासाठी 27 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार विहित अटी व शर्तीनुसार मंजुरी देण्यात आली आहे. ज्या ठिकाणच्या परवानाधारकाचा मृत्यू झालेला आहे, त्या ठिकाणच्या जनतेच्या सोयीसाठी जनहितार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरण करण्यासाबाबत अटी व शर्ती

1. मुद्रांक विक्रेत्याच्या वारसांनी शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील, ज्यात सदर परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याच्या मृत्यूचे कारण स्पष्टपणे नमूद आवश्यक आहे.

2. परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याचा अधिकृत वारसदार म्हणजे पती, पत्नी, मुलगा, मुलगी, मुलाची विधवा पत्नी, नातू व नात असावी व त्याबाबत त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील.

3. परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याचा वारस हा सज्ञान असावा.

4. ज्या वारसास परवाना हस्तांतरण करावयाचा आहे तो सुशिक्षित असावा. त्याने किमान १० वी पास ही शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी.

5. ज्या वारसास परवाना हस्तांतरण करणार आहेत त्याचे पोलिसांकडील चारित्र्य पडताळणी (Good moral character) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

6. मुद्रांक विक्रेत्याच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त वारस असतील, अशा परिस्थितीमध्ये ज्या वारसास मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरीत करावयाचा आहे, त्यासाठी इतर वारसांचे कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर केलेले संमतीपत्र / नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

7. वारसाने सादर केलेली माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहितेमधील कलमांन्वये व अन्य संबंधित कायद्यानुसार त्या वारसावर खटला भरला जाईल व त्यानुसार तो शिक्षेस पात्र राहील.

8. मुद्रांक विक्री परवाना वारसांना हस्तांतरित करण्याबाबतची कार्यवाही मुंबई मुद्रांक पुरवठा व विक्री नियम, १९३४ मधील नियम (७(१) नुसार संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी करावयाची आहे.

9. सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीत मुद्रांक परवाना धारकाच्या वारसांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील.
00000

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे