
सुरगाणा तालुक्यातील कामाबद्दल खासदार भास्कर भगरे यांनी घेतली अधिकाऱ्यांची आढावा बैठक
लक्ष्मण पवार
हतगड..सुरगाणा तालुक्यातील रस्ते, आरोग्य,शिक्षण,दळणवळण आदी सुविधांची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत आहेत. खराब रस्त्यांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांकडून संताप जनक प्रतिक्रिया उमटत आहेत याची दखल दिडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली यावेळी त्यांनी रस्त्यांच्या कामांच्या दर्जा कडे लक्ष देण्याबाबत सबंधित अधिका-यांना सुनावले तालुक्यातील प्रमुख रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याबाबत सूचना केल्या, त्याचबरोबर आरोग्य विभागाचा आढावा घेतला. आरोग्य विभागाच्या कामकाजा बाबत खासदार भगरे यांनी नाराजी दर्शवित अधिकारी, कर्मचारी यांना धारेवर धरले.तालुक्यातील ज्या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीचा कालावधी शिल्लक आहे अशा रस्त्यांवर पडलेल्या खड्यांकडे विशेष लक्ष देत संबंधित कंत्राटदाराकडून ती लवकरच पूर्ण करुन घेण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या.खड्डे बुजवताना फक्त चालढकल काम चालणार नाही तर ते सुद्धा दर्जेदार असावे अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या.यावेळी तालुक्यातील आरोग्य ,शिक्षण, रस्ते, पिण्याचे पाणी या समस्यांकडे विशेष लक्ष देऊन दर्जात्मक कामे करून घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी भगरे यांना दिले.
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत अधिका-यांवर कायम वचक ठेवण्यात यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी माजी आमदार जे.पी.गावित,जेष्ठ नेते आदिवासी सेवक चिंतामण गावित,
मोहन गांगुर्डे, राजेंद्र पवार,कृष्णा चौधरी,तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी महेश पोतदार,कृष्णा चौधरी,इंद्रजित गावित, राजेंद्र पवार आदि उपस्थित होते.