0
4
2
9
5
7
विंचूर आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या कार्यक्रमात होणाऱ्या यज्ञामुळे वातावरणात चांगला परिणाम होतो या सर्व यज्ञ सोहळ्यात सार्वत्रिक आनंद आणि शांतीच्या उद्देशाने केले जातात लोक लोकां समस्था सुखीने भवन्तु ओम शांती शांती शांती ज्याचा अर्थ प्रत्येक जण आनंदी होवो सर्वत्र शांतता नांदावी या व्यतिरिक्त प्रत्येक विशिष्ट यज्ञाचा विशिष्ट प्रभाव व फायदे होतात या यज्ञ सोहळ्यात सहभागी होण्याचे अनेक फायदे आहेत त्यापैकी काही म्हणजे आपले आरोग्य उत्तम, अढळ श्रद्धा ,बुद्धि ,श्रद्धा आणि विश्वास दृढ होतो आणि तर्क खूपच धारदार होतो यज्ञाच्या इतर फायद्यामध्ये उच्च चेतना जागवण्याची क्षमता सामर्थ्य शौर्य दीर्घायुष्य आणि बरेच काही समाविष्ट आहे असे आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते परमपूज्य श्री श्री रविशंकरजी सांगतात या सोहळ्याची सुरुवात रविवार दिनांक 28 सप्टेंबर सकाळी आठ वाजता श्री महागणपती आणि सुब्रमण्य होमा याने होईल त्यानंतर श्री नवग्रह आणि वास्तु होम ,श्री सुदर्शन होम आणि महालक्ष्मी होम होणार आहे तसेच सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता श्री रुद्र होम सुरुवात होणार आहे त्यानंतर श्री चंडी कलश स्थापन व चंडी पारायण होईल मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी श्री चंडी होमा सकाळी सात वाजता सुरू होईल या नवरात्रीमध्ये होणाऱ्या पूजेसाठी व होण्यासाठी होमा साठी आर्ट ऑफ लिविंगच्या बेंगलोर आश्रमातून स्वामी विरूपाक्षजी यांच्या सानिध्यात वेदा पंडित नारायणा रामचंद्र सभाहिता, रवी गोपालकृष्णा भट,विनायक गोपाल कृष्णा भट धुली, हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमांमध्ये कन्या पूजन, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केलेले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा, रंगोली ,स्वच्छता, संकल्प नोंदणी ,सत्संग,साऊंड सिस्टिम ,समिधा आणि हवन सामग्री, यासारख्या विविध समित्या गठीत करून त्या माध्यमातून काम करीत आहे .या नवरात्र उत्सव हा श्रद्धा लॉन्स नाशिक येथे आयोजित केला आहे यासाठी सर्वांना मोफत प्रवेश दिलेला आहे तरी आपण या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे.
0
4
2
9
5
7



