स्कूल बस अपघातातील विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

सुनिल आण्णा सोनवणे, चांदवड…
दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. सुसाट वेगात असलेल्या आलिशान स्विप्ट कारने विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला पाठीमागन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. सदर घटनेची माहिती सोमा कंपनीस प्राप्त झाली असता सोमा कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.. परिसरातील नागरिकांनी जखमींनां सुरक्षीत बाहेर काढुन मदतकार्य सुरू करुन जखमीना जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या व सोमा कंपनीच्या रुग्ण वाहिकेतुन पुढील प्राथमीक उपचारासाठी चांदवड व मालेगांव येथे रवाना केले या अपघातात मात्र, स्विप्ट कारमधील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत त्यातील 2 रूग्णाना मालेगाव येथे तर 2 जण मनोज शिवाजी गडरे, बोरकुंड, धुळे व स्वप्ननील बच्छाव डाबली, ता. मालेगाव यांना उपचारासाठी चांदवड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील मालेगाव येथील रुग्णाचे नावे समजली नसुन त्यांच्यातील 1 जणाची प्रकृती चिंतजनक असल्याची माहीती मिळत आहे तर भरत पुंडलीक घोडके रा बोरकुंड यांचा मृत्यु झाला आहे. नेहमी होणार्या या अपघातमुळे या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जातोय. आज नेहमी प्रमाणे श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचार्यश्रम (जैन गुरूकुल) संचालीत स्वर्गीय श्री धनराज मिश्रीलालजी भन्साळी इंग्लिश मिडीयम स्कुलची बस क्रंमाक चक-15–ज्ञ -1679 हि बस मुलाना घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला ऊभी होती त्यावेळी पाठीमागुन सुसाट येत असलेल्या स्विप्ट कार क्रंमाक ॠग- 15-उग- 7303 ह्या कारमधील चालकाचे कारवरील नियत्रंण सुटल्याने बसला पाठीमागुन जोरदार धडक दिली. धडक इतकी भिषण होती की कारचा अर्धा भाग बसच्या मागील टायरपर्यत दाबला गेला त्यात कारचा चक्काचुर झाला ,या वेळी बसमध्ये बसलेल्या शालेय विध्यार्थी थोडक्यात बचावले असुन सुदैवाने पुढील मोठा अनर्थ टळला असुन बसमधील विद्यार्थी सर्वजण सुखरूप असुन कोणीही जखमी नाही. सोम कंपनीच्या कर्मचार्यांनी क्रेन च्या मदतीने सदर स्वीप्ट कारला बाहेर काढले आहे .वाहन चालक हे अती वेगाने वाहन चालवतात, व परिणामी वाहनावरचे नियंत्रण सुटते त्यातुन अश्या अपघाताच्या घटना घडतात,त्यामुळे वाहनाचा वेग कमी ठेवुन वाहन चालवत सुरक्षीत प्रवास करावा ,असे मत परीसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे .