आरोग्य व शिक्षण
जागतिक कर्करोग दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे जनजागृती कार्यक्रम

0
4
2
9
5
7
निफाड | 4 फेब्रुवारी
जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे दिनांक 4 फेब्रुवारी 26 ते 22 फेब्रुवारी 26 या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. राजीव तांभाळे यांनी सांगितले की, कर्करोग हा आजार वेळीच ओळखला गेला तर त्यावर प्रभावी उपचार शक्य आहेत. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, व्यसनांपासून दूर राहणे आणि आरोग्याविषयी जागरूकता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कर्करोगाबाबत समाजातील भीती व गैरसमज दूर करण्यासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना, उपचार पद्धती तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती दिली.
यानंतर तसेच डॉ धनंजय आथरे यांनी महिला वर्गात आढळणारे कॅन्सर बाबत माहिती सांगताना सांगितले की प्रामुख्याने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा (Cervical Cancer) धोका ९०% पेक्षा जास्त कमी करते, जो स्त्रियांमधील दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. 9 ते 26 वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींसाठी, तसेच 27-45 वयोगटातील प्रौढांसाठी ही HPV आणि Hepatitis B या लसीची शिफारस केली जाते. या
लसीचे डोस हा 15 वर्षांपेक्षा कमी वयासाठी 2 डोस (0, 6 महिने) आणि 15-45 वयोगटासाठी 3 डोस (0, 1-2, 6 महिने) दिले जातात. या लसीची सुरक्षा बाबत बोलताना सांगितले की ही लस सुरक्षित आहे आणि तिचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाहीत. तात्पुरती वेदना, ताप किंवा डोकेदुखी हे सामान्य दुष्परिणाम असू शकतात.
महत्त्व: कर्करोगाचे प्रकार जसे की योनि, वल्व्हर, ओरोफरीन्जियल आणि गुदाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी लस महत्त्वाची आहे. लस घेतली असली तरीही, महिलांनी नियमित गर्भाशय ग्रीवाची तपासणी (Pap Smear) (पॅप स्मीअर) करणे गरजेचे आहे याबाबत उपस्थितांना देण्यात आली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, मेट्रन मॅडम, इन्चार्ज सिस्टर, अधीपरिचारिका, कर्मचारी तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता वाढून आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
0
4
2
9
5
7



