
0
3
2
1
2
3
एसटी कामगार संघटनेची ५ मार्चला निदर्शने
नाशिक/किरण घायदार…
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे एस.टी. कर्मचाऱ्यांची निरनिराळी प्रलंबित असलेली थकबाकी वारंवार मागणी करूनही मिळत नसल्यामुळे नाराजी निर्माण झालेली आहे. कामगारांना देय असलेल्या वाढीव वेतनाच्या थकबाकीमध्ये खंड पडू नये यासाठी १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ रोजी कालावधीची देय होणारी थकबाकी व अन्य प्रलंबित देणी देण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेच्या वतीने ५ मार्च रोजी राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व आगार, विभागासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.
२०१८ पासूनची महागाई भत्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असूनही सदरची थकबाकी अद्याप कामगारांना मिळालेली नाही. २०१६-२०२० या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतनवाढ कामगारांना लागू करताना घरभाडे भत्याचा दर ८,१६, २४ टक्क्यांऐवजी ७,१४, २१ टक्के व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्यांऐवजी २ टक्के असा एकतर्फी कमी केलेला होता. तथापि, माहे नोव्हेंबर २०२१ पासून सदरचा वाढीव दर कामगारांना लागू केलेला असून माहे एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीची घरभाडे भत्याची व वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी एस.टी प्रशासनाकडे प्रलंबित आहे.
सर्व प्रलंबित थकबाकी रक्कमेच्या अधिन राहन कामगारांना सध्या मिळत असलेल्या वाढीव थकबाकीची रक्कम फेब्रुवारी २०२५ देय मार्च २०२५पासून पुढे तशीच सुरू ठेवावी. म्हणजे कामगारांचे दरमहा देय होणारे वेतन कमी होणार नाही, असे कळवूनही प्रशासनने कार्यवाही केली नाही, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली. १ वर्षाचा कालावधी उलटूनही ५० टक्के महागाई भत्ता कामगारांना लागू केलेला नाही.
0
3
2
1
2
3