Breaking
ई-पेपरगुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक

धर्मनाथ बीजेनिमित्त गोरक्ष सहस्त्रनामाचे हवन…

राजराजेश्वरी प्रतिष्ठान व नाथजोगी समाज भक्त मंडळाच्यावतीने धर्मनाथ बीज उत्साहात साजरी

0 3 2 1 2 3

नाशिकरोड: राजराजेश्वरी प्रतिष्ठान व नाथजोगी समाज भक्त मंडळाच्या वतीने राजराजेश्वरी मंगल कार्यालय , नाशिकरोड येथे ‘ धर्मनाथ बीज ‘ दि. ३० व ३१ जानेवारी अशी दोन दिवस उत्साहात साजरी करण्यात आली . प्रारंभी या सोहळ्यात ध्वजपूजन, ध्वजारोहण श्री सुदाम खाचणे यांनी सपत्नीक शंखनादामध्ये केले . त्यानंतर चिमटा व त्रिशूल, अखंड धुनी, अखंड दीप प्रज्व्लन, गुरु पादुका यांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री गोरक्षनाथ प्रतिष्ठा करण्यात आली. आलेल्या सर्व नाथ बंधू भगिनींचे स्वागत माजी जिल्हाधिकारी व नाथभुषण  पुरस्काराने सन्मानित रघुनाथजी राठोड यांनी केले.
           त्यानंतर दुसरे दिवशी ध्वज पूजन व ध्वजारोहण डॉ, काशिनाथ बुवा यांनी सपत्नीक शंखनादात केले. त्यानंतर श्री गणेश पूजन , हनुमान पुजन, कालभैरव पूजन, श्री सद्गुरु गोरक्षनाथ प्रतिमा पूजन उपस्थित जोडप्यांच्या हस्ते होऊन गोरक्ष गायत्री मंत्र पुष्पांजली,होमहवन,गोरक्ष सहस्रनाम मंत्र पुष्पांजली, श्री सद्गुरु गोरक्षनाथ महाआरती व त्यानंतर महाप्रसाद असा कार्यक्रम संपन्न झाला . या बीज उत्सवाच्या यशस्वीतेसाठी  अभिजित खरे, चंद्रशेखर कासार, राजाराम जाधव,अनिल घोलप,किरणनाथ चव्हाण, संजयनाथ परमसागर, वासुदेवनाथ ताडे, विशालनाथ जोगी,संतोषनाथ वाघ, सुधीर वाघमारे, राजशेठ राठोड, अंजली राठोड, वैशालीताई राठोड, निर्मल वाघमारे, सागर हिरडे, मनोज पारखे, सुधीर खापरे, मदन केदारे,मधुकरनाथ उभयकर,आण्णानाथ घोंगडे,यासह  नाथ जोगी समाज व नाथ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी गोरक्षनाथ पादुका व नवनाथ ग्रंथ लकी ड्रॉ पद्धतीने भेट देण्यात आली . त्यानंतर महाप्रसादाचा लाभ असंख्य नाथभक्तांनी घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे